अन्न हेच पूर्णब्रह्म

अन्न हेच पूर्णब्रह्म

This slideshow requires JavaScript.

अन्न हेच पूर्णब्रह्म हा ब्लॉग अतिशय, सोप्या, सुटसुटीत रेसिपींची माहिती देणारा ब्लॉग आहे. या ब्लॉगवर तुम्हाला रोजच्या जेवणातले पदार्थ तर बघायला आणि वाचायला मिळतीलच. पण त्याचबरोबर पारंपरिक पदार्थही वाचायला मिळतील. यात धार्मिकतेचा भाग नाही तर चांगल्या परंपरांचं जतन व्हावं असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच या ब्लॉगवर मराठी सणांबरोबरच, ईद, पतेती आणि ख्रिसमस यासारख्या इतर धर्मीयांच्या सणांना केले जाणारे पदार्थही बघायला मिळतील. या परंपरांमधूनच आपण खाद्यसंस्कृती जपत असतो असं मला वाटतं.

या ब्लॉगवर तुम्हाला पदार्थांबद्दल तर सविस्तर  वाचायला मिळेलच पण त्याचबरोबर खाद्यसंस्कृती, स्वयंपाकाचं नियोजन, स्वयंपाकातलं ललित, रेस्टॉरंट्सचे अनुभव, रेसिपी बुक्स याविषयीही वाचायला मिळेल. कारण हे सगळे विषय स्वयंपाकाशी निगडीत आहेत असं मला वाटतं. अनेक उत्तमोत्तम मराठी रेसिपी बुक्स बाजारात आहेत. ती खूप उपयोगी असतात हे स्वानुभवानं सांगेन. पण पुस्तकांशी आपण संवाद साधू शकत नाही. या ब्लॉगवर मी जे लिहिते, त्याबद्दल तुम्ही मला तुमच्या शंका, प्रश्न विचारू शकता. तुम्ही त्याविषयी काय करता हेही शेअर करू शकता. आणि शक्यतो प्रत्येकाला उत्तर देण्याचा मी मनापासून प्रयत्न करत असते. तेव्हा आपला हा संवाद इंटरअॅक्टिव्ह होतो. आधी मी याच नावाचं फेसबुक पेज सुरू केलं आणि त्यानंतर हा ब्लॉग सुरू केला. केवळ एका वर्षातच मला देशविदेशातले अनेक मित्र मिळाले आहेत जे आवर्जून प्रतिसाद देत असतात.

जेव्हा तुम्ही या ब्लॉगवरचं काही वाचाल किंवा काही करून बघाल तेव्हा प्रतिसाद नक्की द्या.

सायली राजाध्यक्ष

share25

माझा इ-मेल आयडी आहे – sayali.rajadhyaksha@gmail.com

Advertisements