नाश्त्यासाठी रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र प्रसन्ना जोशी यांनी नाश्त्यासाठी सोपे आणि झटपट होणारे पदार्थ सुचवायला सांगितले आहेत. तेव्हा मी आज नाश्त्यासाठीच्या दोन सोप्या पण रूचकर पदार्थांची रेसिपी शेअर करणार आहे. त्यातला पहिला पदार्थ आहे उपमा. उपमा आपण सगळेच करतो. कुणी हळद, उडदाची डाळ, कढीलिंब, सुकी मिरची घालून सांजा करतात. तर कधी कुणी मटार, गाजर घालून करतात. कुणी दाक्षिणात्य पध्दतीचं उप्पीट करतात. थोडक्यात काय तर उपमा हा असा प्रकार आहे की आपण त्यात आपल्या कल्पनाशक्तीनं वैविध्य आणू शकतो. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे कॉर्न दाणे घालून केलेल्या उपम्याची.
उपमा

साहित्य: 1 वाटी भाजलेला रवा, 1 मोठा कांदा मध्यम चिरलेला, एक वाटी स्वीट कॉर्नचे दाणे, एक इंच आलं आणि 2-3 कमी तिखट मिरच्या वाटून, 2 टेबलस्पून दही, 3 वाट्या पाणी, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून ओलं खोबरं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून साजुक तूप, फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, 1 टीस्पून उडदाची डाळ, कढीपत्त्याची 8-10 पानं.
कृती:
आजची दुसरी रेसिपी आहे मुगाच्या धिरड्यांची. ब-याच दाक्षिणात्य रेस्टॉरंटमधे पेसरट्टू नावाचे मुगाचे डोसे मिळतात. हा तसाच काहीसा प्रकार पण धिरड्यांच्या जास्त जवळ जाणारा.
मुगाची धिरडी

साहित्य: 1 वाटी मूग, 2-3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, एक ते दीड इंच आलं, 3-4 कमी तिखट हिरव्या मिरच्या,1 कांदा बारीक चिरलेला, 2 टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल
कृती:
एवढ्या मिश्रणाची 7-8 धिरडी होतात. याच पध्दतीनं मूग डाळीची धिरडीही करता येतात.