कोलंबी, तिस-या, खेकडे किंवा चिंबो-या, कालवं हे शेलफिशचे प्रकार (म्हणजे जे मासे कवचात असतात असे माशांचे प्रकार ) फार चविष्ट लागतात असं म्हणतात. म्हणतात असं यासाठी म्हणतेय की मी स्वतः शाकाहारी आहे त्यामुळे मला माशांची चव माहीत नाही. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती एका अर्थानं आमची खानदानी रेसिपी आहे असं म्हणता येईल! कारण ही रेसिपी माझ्या सासुबाईंचं innovation आहे. कोलंबीची आमटी, कोलंबीची भजी, कोलंबीचं भुजणं, कोलंबीचं सुकं वगैरे प्रकार आपल्याला माहिती आहेतच. कोलंबीचं लोणचंही ब-याच जणांना माहीत असेल. पण आज ही जी कोलंबीच्या लोणच्याची रेसिपी मी शेअर करणार आहे ती अतिशय वेगळी आहे. हे लोणचं फार चवदार लागतं असं खाणारे सांगतात. तेव्हा करून बघा आणि मला सांगा कारण मी तर खात नाही! आजची रेसिपी ही खास मांसाहारी खवय्यांसाठी.
कोलंबीचं लोणचं

साहित्य: 2 वाट्या लहान किंवा मध्यम आकाराची कोलंबी (फार मोठी नको), अर्धी वाटी लसूण, अर्धी वाटी कुकिंग (व्हाईट) व्हिनेगर, 10-12 सुक्या लाल बेडगी मिरच्या, पाव लिंबाएवढी चिंच, एक टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून साखर, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
वाटण मसाल्याची कृती: सुक्या मिरच्या, लसूण आणि चिंच एकत्र करून बारीक वाटून घ्यावं. वाटताना एखादा टेबलस्पून पाणी घालावं. एकजीव पेस्ट करावी.

कृती:
1) प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून तिला हळद, तिखट, मीठ आणि व्हिनेगर लावून अर्धा तास मुरत ठेवावं.
2) नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करावं. त्यात हिंग घालावा.
3) गरम तेलात वाटलेला मसाला घालून चांगलं परतावं. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे.
4) नंतर त्यात मुरत ठेवलेली कोलंबी घालून परतावं.
5) जरासं परतून त्यात बेताचं ( साधारण एक ते दीड कप) पाणी घालावं. साखर घालावी आणि कोलंबी शिजू द्यावी. शिजल्यावर गॅस बंद करावा.
हे लोणचं इतर मांसाहारी जेवणाबरोबर तोंडीलावणं म्हणून छान लागतं.
Sayli ,tuza recipiescha blog aani tuza sharing aani style mala khup aavadli .mazya doghi lekinahi tuza blog aavadto .Literature aani cooking he mazepan main interest aahet . Aata tuza blog vachun kalvat jain .saraswat community ,aani Aurangabad -Mahim (Bandra )mhanje donhicha mixed culture hya aaplyatya sarakhepanamule kadachit mala tuza blog appeal zala .bye
LikeLike
उषामावशी, तुम्ही माझा ब्लॉग वाचता आणि तुम्हाला तो आवडतो हे वाचून मला खूप छान वाटलं. प्लीज मला ब्लॉगविषयी नक्की कळवत जा. तुम्ही कशा आहात? मी नुकतीच औरंगाबादला योऊन गेले. तुमच्या कौतुकाबद्दल आभार मानत नाही!
LikeLike
Nakki mi touchmadhe rahin . Phakta ajun mi khup computer -fŕiendly aani navya technologyt expert nahi tyamule ĺekinchi madat lagte . pan halu halu savay hoil .tuzya upakramala shubhechha .
LikeLiked by 1 person
Sayalimadam, me tumche sagale blog vachate.
mala cake chya simple recipe with oven & without oven pahijet, pls mala dyal ka?
LikeLike