दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी

मराठी जेवणात ताटात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना म्हणजेच चटणी, लोणची, कोशिंबिरींना महत्वाचं स्थान आहे. कोशिंबिरींमधून जीवनसत्वं मिळतात तर चटण्या आणि लोणची जेवणाची चव वाढवण्याबरोबरच अन्न पचनासाठी आवश्यक असलेल्या पाचक रसांच्या निर्मितीमधे मोलाचं काम बजावतात. म्हणूनच मराठी जेवण हे परिपूर्ण असतं असं म्हणतात ते उगीच नाही.
माझ्या माहेरी चटण्या-लोणच्यांची रेलचेल असते. दाण्याची, तिळाची, जवसाची, कारळाची, सुक्या खोब-याची अशा कोरड्या चटण्या आईकडे कायम असतात. एकूणच मराठवाड्यात तिखटाचं प्रमाण जास्त असल्यानं तोंडीलावण्यांचे प्रकार खूप असतात. आज मी तीन चटण्यांची रेसिपी शेअर करणार आहे. पहिल्या दोन चटण्या आहेत: शेंगदाणा आणि तीळ. तिसरी रेसिपी आहे ती आहे पूड चटणी या खास कर्नाटकी चटणीची.

दाण्याची चटणी

तयार दाण्याची चटणी
तयार दाण्याची चटणी

साहित्य: दीड वाटी शेंगदाणे, दीड टेबलस्पून लाल तिखट, दीड टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार

कृती:

1) प्रथम शेंगदाणे मध्यम आचेवर सतत हलवत लाल रंगावर खमंग भाजून घ्यावेत.
2) शेंगदाणे कोमट झाले की त्यांची सालं काढून घ्यावीत.
3) मिक्सरमध्ये शेंगदाणे जाडसर कूट होईल इतपत जरा फिरवून घ्यावेत.
4) नंतर त्यात तिखट,मीठ, हिंग घालून परत फिरवावं. चटणी जाडसर हवी.

तिळाची चटणी

तिळाची तयार चटणी
तिळाची तयार चटणी

साहित्य: १ वाटी तीळ, १ टेबलस्पून लाल तिखट, १०-१२ लसूण पाकळ्या, मीठ चवीनुसार

कृती:

1) प्रथम तीळ मध्यम आचेवर लाल रंगावर खमंग भाजून घ्यावेत.
2) तीळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून जाडसर पूड होईल इतपत फिरवून घ्यावेत.
3) नंतर त्यात लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि मीठ घालून अगदी एकदाच फिरवावं.

याच पध्दतीनं दाण्याचीही लसूण घातलेली चटणी करता येते.

दोन्ही चटण्यांमध्ये तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावं.

पूड चटणी

तयार पूड चटणी
तयार पूड चटणी

साहित्य: १ वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, २ टेबलस्पून तांदूळ, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, १ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जिरं, १०-१२ सुक्या बेडगी लाल मिरच्या, १ वाटी कढीपत्ता, पाव वाटी किंवा मूठभर चिंच, चिंचेएवढाच गूळ, अर्धा टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार

कृती:

1) प्रथम कढईत थोडं तेल घालून, अनुक्रमे दोन्ही डाळी, तांदूळ, तीळ, धणे, जिरं, मिरच्या, कढीपत्ता हे साहित्य मध्यम आचेवर खमंग भाजून बाजुला ठेवावं.
2) नंतर चिंचसुध्दा थोड्या तेलावर जराशी भाजून घ्यावी.
3) सुकं खोबरं कोरडं लाल रंगावर भाजून घ्यावं. त्यातच हिंग घालून जरासं परतावं.
चटणीचं भाजलेलं साहित्य
चटणीचं भाजलेलं साहित्य

4) सर्व साहित्य गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावं.

5) आता त्यात मीठ आणि गूळ घालून परत वाटावं. ही चटणी जराशी जाडसरच ठेवावी. या चटणीचं टेक्श्चर हेच तिचं वैशिष्ट्य आहे. खाताना चटणी जराशी दाताखाली आली पाहिजे.

गरमागरम मऊ आसट भातावर घालून ही चटणी खाऊन तर बघा! किंवा गरम इडलीबरोबर खा किंवा लावलेल्या पोह्यांमधे घाला. किंवा नुसतीच खा, अप्रतिम लागते!

3 thoughts on “दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: