क्रीम ऑफ टोमॅटो सूप आणि ओपन टोस्ट

मुंबईत गेले चार-पाच दिवस छान पाऊस पडतोय. अशी मस्त पावसाळी हवा असताना गरमागरम भजी किंवा बटाटेवडे किंवा भाजलेलं मक्याचं कणीस तर खायलाच हवं. रात्री बाहेरचे इतर आवाज शांत झाल्यावर फक्त पावसाचा येणारा आवाज! अहा! आयुष्य सुंदर आहे!
अशा या पावसाळी हवेत जेवणासाठी मस्तपैकी गरम सूप आणि त्याबरोबर काहीतरी चटकमटक खायला असेल तर माणसाला आणखी काय हवं! काल मी अतिशय सोपं असं टोमॅटो सूप आणि त्याबरोबर खाण्यासाठी ओपन टोस्ट केले होते. त्याचीच रेसिपी आज देणार आहे.

टोमॅटो सूप आपण सगळेच करतो. खूप वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. आजची ही रेसिपी अतिशय सोपी आहे. माझी मैत्रीण विंदा डोंगरे हिची ही रेसिपी आहे. कमीतकमी साहित्य वापरून केलेलं हे सूप चविष्ट होतं.

क्रीम ऑफ टोमॅटो सूप

तयार टोमॅटो सूप आणि ओपन टोस्ट
तयार टोमॅटो सूप आणि ओपन टोस्ट


साहित्य: सहा मोठे टोमॅटो, तीन टेबलस्पून घट्ट साय, एक कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार

सूपचं साहित्य
सूपचं साहित्य


कृती:

1) प्रथम टोमॅटो अगदी बेताचं पाणी घालून कुकरमधे शिजवून घ्या.

2) थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टोमॅटो, साय आणि दूध घालून फिरवून घ्या. हे मिश्रण गाळणीतून गाळून घ्या.

3) मिश्रण एका पातेल्यात काढून त्यात मीठ आणि मिरपूड घाला.

4) सूप उकळून घ्या.

टोमॅटो सूप तयार आहे.
माझी मैत्रीण एका टोमॅटोला एक टेबलस्पून साय घालते म्हणून तिचं सूप अफलातून चवदार होतं. मी जरा कॅलरीजचा विचार करून सायीचं प्रमाण कमी केलं आहे. पण एखाद्या वेळी जास्त साय घालून खायला हरकत नाही! कारण साय जास्त घातली तर हे सूप खरंच फार चविष्ट होतं.

एवढं सूप साधारणपणे दोन माणसांना पोटभर होतं.

या सूपबरोबर खायला मी काल ओपन टोस्ट केले होते.

ओपन टोस्ट

टोस्ट तव्यावर भाजा
टोस्ट तव्यावर भाजा


साहित्य: चार बटाटे उकडून बारीक चिरलेले, एक सिमला मिरची पातळ लांब कापून मग अर्ध्या इंचाचे तुकडे केलेली, एक वाटी कॉर्न दाणे उकडलेले, १५-२० पालकाची पानं धुवून कोरडी करून बारीक चिरलेली, ६ चीज क्यूब किसलेले, २ टीस्पून रेडिमेड पिझ्झा मसाला किंवा इटालियन मिक्स्ड हर्ब्ज, पाऊण टीस्पून चिली फ्लेक्स, मीठ, मिरपूड चवीनुसार, ब्रेड स्लाइस, थोडंसं बटर

टोस्टचं साहित्य
टोस्टचं साहित्य


कृती:

1) प्रथम ब्रेड स्लाइसना एका बाजुनं हलकंसं बटर लावून घ्या.

2) चिरलेले बटाटे मॅशरनं हलकेसे मॅश करून घ्या.

3) बटाटा, सिमला मिरची, कॉर्न दाणे, पालक, चीज, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स, मीठ आणि मिरपूड हलक्या हातानं एकत्र करून घ्या.

4) ब्रेडला ज्या बाजुनं बटर लावलेलं नाही त्यावर हे मिश्रण एकसारखं पसरून घाला. गरम तव्यावर मंद आचेवर टोस्ट करा. ओव्हनमध्येही करू शकता.

एवढ्या मिश्रणात साधारण दहा टोस्ट होतात

3 thoughts on “क्रीम ऑफ टोमॅटो सूप आणि ओपन टोस्ट

  1. Sayali, Masta look n feel. All your recipes are simple to make and healthy and visually appealing. :*
    All the best to you.

    Like

  2. Hi. तुमची वेबसाइट आणि रेसिपीज व त्यांची लिहायची पद्धत अतिशय सुबक व नेटकी असते. Love it.
    Thanks

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: