आजची रेसिपी आहे भुरका. भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार मराठवाड्यात लोकप्रिय आहे. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की काम भागतं. विशेषतः पिठलं, भाकरी, वांग्याचं भरीत किंवा मराठवाड्यात केल्या जाणा-या उकडशेंगोळे या पदार्थाबरोबर भुरका मस्त लागतो.
भुरका

साहित्य – अर्धी वाटी तेल, मोहरी, २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार.
कृती :
1) प्रथम छोट्या कढलीत किंवा पळीत तेल कडकडीत गरम करून घ्या.
2) त्यात मोहरी घालून नेहमीसारखी फोडणी करा. नंतर त्यात तीळ घालून तीळ फुटू द्या. आता त्यात शेंगदाण्याचं कूट घाला.
3) अगदी अर्धा मिनिट परतून गॅस बंद करा. लाल तिखट आणि मीठ घाला. भुरका तयार!
वर मी तीळ आणि दाण्याच्या कुटाचं प्रमाण दिलंय खरं, पण या वस्तू अंदाजानंच घाला. भुरका फार घट्ट व्हायला नको. आणि हो, भुरका तिखटच खायचा असतो तेव्हा तिखटाचं प्रमाण जरा जास्तच हवं.
nehamichi phodani mhanaje hing n halad pan ghalaychi ka?
LikeLike
Hello.. Thanks for such a nice initiative and sharing awesome receipes. How to get your digital magazine..
Thanks and regards
Pallavi Patil
LikeLike
Thanks! Pl visit http://www.digitaldiwali2014.wordpress.com
LikeLike
http://www.digitalkatta.com
LikeLike
Khupch innovative aani healthy recipes astat tumchya thanks…..
LikeLike