मेथी-वांगं-बटाटा भाजी

स्वतंत्रपणे मेथीची किंवा वांग्याची भाजी न आवडणारे अनेक लोक असतील. पण मी आज जी मेथी-वांगं-बटाटा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे ती अतिशय फर्मास लागते. ती सगळ्यांना नक्की आवडेल. कारण या भाजीला कुठलेही मसाले घालायचे नाहीत, अगदी हळदही नाही. त्यामुळे या भाजीची चव उत्कृष्ट लागते. ही भाजी मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू सुमा चिटणीस यांची ही रेसिपी आहे. माझ्या सासुबाईंनी एकदा त्यांच्याकडे ही भाजी खाल्ली आणि त्यांना ती इतकी आवडली की ती आमच्या घरीही नियमितपणे व्हायला लागली. तुम्हीही ही करून बघा. तुमच्या घरीही मेथी-वांगं-बटाटा भाजी नेहमी होईल.

मेथी-वांगं-बटाटा भाजी

मेथी-वांगं-बटाटा भाजी
मेथी-वांगं-बटाटा भाजी

साहित्य : एक भली मोठी मेथीची जुडी किंवा मेथीच्या 5-6 लहान जुड्या, 8-9 कोवळी जांभळी बिनबियांची वांगी, 2 मध्यम बटाटे,दीड टेबलस्पून लसणाचे बारीक चिरलेले तुकडे, लसणाच्या अर्धे आल्याचे बारीक तुकडे, 5-6 कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार


कृती:

1) प्रथम मेथी कोवळ्या देठांसकट निवडून घ्यावी. नंतर ती पाण्यात बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्यावी आणि कोरडी करण्यासाठी पंचावर पसरून ठेवावी.
2) मेथी कोरडी झाल्यावर बारीक चिरून घ्या. वांग्यांचे बारीक तुकडे करा. बटाट्याचे सालासकट बारीक तुकडे करा.
3) एका नॉनस्टिक कढईत तेल गरम करा. त्यात आलं-लसूण-मिरचीचे तुकडे घाला. चांगलं परता पण लसूण लाल करायचा नाहीये हे लक्षात ठेवा.
कढईत शिजत असलेली भाजी
कढईत शिजत असलेली भाजी
4) आता त्यात मेथी घाला. मेथी मस्त वास येईपर्यंत चांगली परता.
5) नंतर त्यात चिरलेले वांगी-बटाट्याचे तुकडे घाला. मीठ घाला आणि झाकण ठेवून भाजी शिजू द्या.

6) भाजी बटाटा अगदी मऊ होईपर्यंत शिजवा.

ही भाजी रोजच्या जेवणासाठी करा किंवा एखाद्या पार्टीसाठी, नक्की सगळ्यांना आवडेल. जेवढे वांग्याचे तुकडे साधारण तेवढेच बटाट्याचे तुकडे घ्यायचे हे प्रमाण लक्षात ठेवा. बटाटा सालासकट घ्यायचा आहे.

एवढी भाजी साधारणपणे 4 जणांना पुरते.

(4 photos)

Advertisements

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s