स्वतंत्रपणे मेथीची किंवा वांग्याची भाजी न आवडणारे अनेक लोक असतील. पण मी आज जी मेथी-वांगं-बटाटा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे ती अतिशय फर्मास लागते. ती सगळ्यांना नक्की आवडेल. कारण या भाजीला कुठलेही मसाले घालायचे नाहीत, अगदी हळदही नाही. त्यामुळे या भाजीची चव उत्कृष्ट लागते. ही भाजी मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू सुमा चिटणीस यांची ही रेसिपी आहे. माझ्या सासुबाईंनी एकदा त्यांच्याकडे ही भाजी खाल्ली आणि त्यांना ती इतकी आवडली की ती आमच्या घरीही नियमितपणे व्हायला लागली. तुम्हीही ही करून बघा. तुमच्या घरीही मेथी-वांगं-बटाटा भाजी नेहमी होईल.
मेथी-वांगं-बटाटा भाजी

साहित्य : एक भली मोठी मेथीची जुडी किंवा मेथीच्या 5-6 लहान जुड्या, 8-9 कोवळी जांभळी बिनबियांची वांगी, 2 मध्यम बटाटे,दीड टेबलस्पून लसणाचे बारीक चिरलेले तुकडे, लसणाच्या अर्धे आल्याचे बारीक तुकडे, 5-6 कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
कृती:
6) भाजी बटाटा अगदी मऊ होईपर्यंत शिजवा.
ही भाजी रोजच्या जेवणासाठी करा किंवा एखाद्या पार्टीसाठी, नक्की सगळ्यांना आवडेल. जेवढे वांग्याचे तुकडे साधारण तेवढेच बटाट्याचे तुकडे घ्यायचे हे प्रमाण लक्षात ठेवा. बटाटा सालासकट घ्यायचा आहे.
एवढी भाजी साधारणपणे 4 जणांना पुरते.
Really thankful
LikeLike