वरणफळं

आज माझ्या सासुबाईंचा (विजया राजाध्यक्ष) एक्याऐंशीवा वाढदिवस आहे. मी मागेही लिहिलं होतं की त्या स्वतः अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. बरेच पदार्थ मी त्यांच्याकडून शिकले आहे. वेळोवेळी मी त्या पदार्थांच्या रेसिपीज या पेजवर देणारच आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या हातच्या आवडणा-या एका पदार्थाची रेसिपी मी शेअर करतेय. वरणफळं हा तो पदार्थ. वन डिश मील म्हणून करण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे. हा पदार्थ ब-यापैकी लोकप्रिय आहे. मराठी घरांमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो. कुणी मटकीची पातळ उसळ करून त्यात पोळीचे तुकडे घालून हा पदार्थ करतात त्याला मटकीफळं म्हणतात. तर काही ठिकाणी लसणाचं वरण करून हा पदार्थ करतात. आमच्याकडे चिंच-गुळाच्या आमटीत हा पदार्थ केला जातो. गुजराती लोकांच्या डाळ-ढोकळीसारखाच एक प्रकार. तेव्हा आज या पदार्थाची रेसिपी.

वरणफळं

तयार वरणफळं
तयार वरणफळं


साहित्य: एक वाटी तूर डाळीचं शिजवलेलं वरण, आठ पोळ्या होतील इतकी भिजवलेली कणीक, दीड टेबलस्पून चिंचेचा कोळ, 2 टेबलस्पून गूळ, फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, दीड टीस्पून काळा/गोडा मसाला, मीठ चवीनुसार

वरणफळांना लागणारं साहित्य
वरणफळांना लागणारं साहित्य


कृती :  

1) प्रथम भिजवलेल्या कणकेच्या पोळपाटाच्या आकाराएवढ्या पोळ्या लाटून घ्याव्यात आणि त्यांचे शंकरपाळ्यांना कापतो तशा आकाराचे तुकडे कापून घ्यावेत.

पोळ्या लाटून अशी फळं कापा
पोळ्या लाटून अशी फळं कापा

2) नंतर मध्यम आकाराच्या कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग, हळद घालावी.

3) नंतर त्यात शिजवलेलं वरण घालावं. वरणात पुरेसं पाणी घालून ( साधारण एक लिटर) ते अगदी पातळ करावं. त्यात आपण पोळीचे तुकडे घालून शिजवणार आहोत त्यामुळे ते नंतर घट्ट होतं. म्हणून अगदी पातळ पाण्यासारखं वरण करावं.

4) त्यात तिखट, मीठ, काळा मसाला, चिंचेचा कोळ आणि गूळ घालावा. चव बघून मसाला कमी-जास्त करावा. ही आमटी आंबट-गोड-तिखट व्हायला हवी.

5) आमटीला उकळी आली की त्यात पोळीचे तुकडे म्हणजे फळं घालावीत. एकदा हलवून कुकरचं झाकण शिटीसकट लावावं. अगदी मंद गॅसवर 12 ते 15 मिनिटं शिजू द्यावं.

खायला देताना वरणफळांवर साजूक तूप घालून घालून द्यावं.

एवढी वरणफळं साधारण तीन-चार माणसांना पुरतात.

One thought on “वरणफळं

  1. Methai fala ani, golyachi amti recipe apratim. Tried it. Amazing…. Golyachi amti tried first time and it’s amazing… Thanks for sharing such lovely recipes…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: