ज्वारीच्या पिठाची थालिपीठं

माझ्या आईकडे ज्वारीच्या पिठाचा मुबलक वापर करतात. ब-याच पदार्थात व्यंजन म्हणून ज्वारीचं पीठ वापरतात. आई तर भजी करतानाही डाळीच्या पिठाबरोबर थोडंसं ज्वारीचं पीठ घालते, त्यामुळे भजी खुसखुशीत होतात. माझ्या माहेरी थालिपीठं ही ज्वारीच्याच पिठाची होतात. भाजणीचं थालिपीठ फार क्वचित केलं जातं. शिवाय बरेचजण थालिपीठं तळतात. आमच्याकडे थालिपीठं तव्यावर लावतात. आई तर पूर्वी जड बुडाच्या पातेल्यात लावायची. शिवाय ही थालिपीठं जाडच लावायची, त्यासाठीचा कांदाही मोठा, जाडच चिरायचा. पण या थालिपीठांची चव अफलातून लागते. तेव्हा आजची रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाच्या थालिपीठांची.

ज्वारीच्या पिठाची थालिपीठं

तयार थालिपीठ चटणी, लोणचं आणि शेंगदाण्यांबरोबर द्यावं.
तयार थालिपीठ चटणी, लोणचं आणि शेंगदाण्यांबरोबर द्यावं.

साहित्य: २ वाट्या ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी डाळीचं पीठ (बेसन), २ कांदे मोठे, जाड चिरलेले, २-३ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार,  चिमूटभर हिंग, पाणी, थालिपीठं लावण्यासाठी तेल

कृती:

१) प्रथम ज्वारीचं पीठ, कणीक आणि डाळीचं पीठ एका परातीत एकत्र करावं.

२) आता त्यात जाडसर चिरलेला कांदा, तिखट, मीठ, हिंग, हळद घालून नीट मिसळावं.

३) त्यात लागेल तसं पाणी घालून थालिपीठाचं पीठ भिजवावं. हे पीठ साधारणपणे भाकरीचं पीठ भिजवतो त्यापेक्षा जरा सैलसर भिजवावं.

४) आता तव्यावर थोडंसं तेल घालून पिठाचा मोठा गोळा घेऊन तव्यावर थालिपीठ लावावं. थालिपीठ लावताना जाडसरच लावायचं आहे. पातळ करायचं नाहीये.

५) थालिपीठाला छिद्रं करावीत. त्यात थोडं थोडं तेल सोडावं.

६) गॅसवर मध्यम आचेवर प्रथम झाकण ठेवून थालिपीठ भाजावं. पाच मिनिटांनी झाकण काढावं.

७) थालिपीठ एका बाजुनं लाल झालं की मग उलटावं. दुस-या बाजुनंही लाल करावं.

एवढ्या पिठात दोन अगदी मोठी (साधारणपणे तवाभर), नाही तर चार लहान थालिपीठं होतात.

थालिपीठाबरोबर लोण्याचा गोळा किंवा तूप, लोणचं, दाण्याची चटणी आणि भाजलेले शेंगदाणे खावेत. मस्त लागतं.

2 thoughts on “ज्वारीच्या पिठाची थालिपीठं

  1. Adalya divashichi uraleli bhaji ( kuthalihi pan vangyachi bhaji , palebhaji asel tar uttam, dal, bhat) tyamadhe kuskarun ghatala tar thalipith ajunach chhan lagate

    Like

  2. Kanda , tikhat, hald meeth, kothimbir adhi kuchkarun mix kara, 5 minute nantar pith mix kara. Kanda, meethala pani sutalyane flavours chan murtat.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: