पाव-भाजी

पाव-भाजी हा आपल्याकडे मिळणारा एक अफलातून प्रकार. विशेषतः बंबईय्या पाव-भाजी तर विशेष प्रसिध्द आहे. अर्थात मी माझ्या नव-याबरोबर वाद घालते की औरंगाबादला क्रांती चौकात मिळणारी कैलास पाव-भाजी ही मी आत्तापर्यंत खाल्लेली सर्वोत्तम पाव-भाजी आहे! कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटाटा, वाटाणा अगदी लगदा होईपर्यंत शिजवून, त्यात लसूण-मिरची-जि-याचं वाटण घालून अमूल बटरमधे केलेली खमंग भाजी आणि बरोबर लोण्यात मस्त तळलेले गरम लुसलुशीत पाव, व्वा क्या बात है! शिवाय भाजीवर वरून अगदी बारीक चिरून घातलेला कांदा, शिवाय आमच्या औरंगाबादला कैरीच्या मोसमात वरून बारीक चिरलेली कैरीही घालतात. आवडत असल्यास काही लोक चीजही घालतात. पण चीज घालून खमंग भाजीची चव काहीशी सौम्य होते असं मला वाटतं, त्यामुळे मी घालत नाही. मुंबईत ताडदेवच्या सरदारमधे मिळणारी तसंच फोर्टमधे कॅननला मिळणारी पाव-भाजी अप्रतिम असते. पण आमचा मित्र शशी व्यास याचं म्हणणं आहे की, त्याची बायको ज्योती ही मुंबईतली सगळ्यात उत्तम पाव-भाजी बनवते. त्यानं अलिकडेच एक किस्सा सांगितला. शशीची पंचम-निषाद ही संस्था संगीतविषयक कार्यक्रम करत असते. ब-याच वर्षांपूर्वी एकदा रात्री असाच एक कार्यक्रम संपवून शशी, झाकिर हुसेन, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा आदी मंडळी जेवायला बाहेर पडली. हा कार्यक्रम त्या काळातला जेव्हा कार्यक्रम संपवण्यासाठी रात्री दहाची मर्यादा नव्हती. त्यामुळे साहजिकच ब-याच उशीरा हे सगळेजण जेवायला बाहेर पडले. तेव्हा बहुतेक सगळी हॉटेल्स बंद झाली होती. शेवटी शशीनं त्यांना सायनजवळ कुठेतरी रस्त्यावर पावभाजी खायला नेलं. मोहन नावाचा एक पाव-भाजीवाला शशीच्या ओळखाचा होता. त्याची गाडी त्यावेळी सुरू होती. शशीनं त्याला चांगली पाव-भाजी बनवायला सांगितलं. तशी त्यानं ती बनवलीही. अर्थात आपल्या गाडीवर खायला आज संगीतविश्वातले दिग्गज कलाकार आले आहेत हे त्या बिचा-याच्या गावीही नव्हतं. झाकिर हुसेन, हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांनी मात्र मनापासून त्या पावभाजीचा आस्वाद घेतला. झाकिर हुसेन यांनी खूष होऊन त्याला चांगली बक्षिसीही दिली. आता मोहन पावभाजीची गाडी लावत नाही. तर अशा या सगळ्यांना आवडणा-या पावभाजीची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.

पाव-भाजी

तयार पाव भाजी
तयार पाव भाजी

साहित्य: पाव किलो फ्लॉवरचे तुरे, पाव किलो वाटाणे, ५ कांदे अगदी बारीक चिरलेले, ५ टोमॅटोंचा रस, २ गाजरं (ऐच्छिक), ४ लहान बटाटे, २ सिमला मिरच्या (१ शिजवताना घालण्यासाठी आणि १ अगदी बारीक चिरलेली) २ टेबलस्पून अमूल बटर किंवा तेल, २ टेबलस्पून एव्हरेस्ट पाव-भाजी मसाला, मीठ चवीनुसार, बरोबर खाण्यासाठी पाव, पाव भाजण्यासाठी अमूल बटर, वरून घालण्यासाठी: बारीक चिरलेला पांढरा किंवा लाल कांदा, कोथिंबीर आणि लिंबू

वाटण मसाला: ८-१० लसूण पाकळ्या, १ टीस्पून जिरं, ५-६ बेडगी लाल मिरच्या (१ तास भिजून ठेवा) हे सगळं एकत्र अगदी बारीक वाटून एकजीव पेस्ट करा. वाटताना पाण्याचा वापर करा.

कृती:

१) फ्लॉवर, वाटाणा, एक सिमला मिरची, गाजरं जाडसर चिरा आणि कुकरच्या भांड्यात घालून १ वाटी पाणी घालून अगदी लगदा होईपर्यंत शिजवून घ्या.

२) कुकरच्या दुस-या भांड्यात पाणी न घालता बटाटेही शिजवून घ्या.

३) सगळ्या भाज्या गरम असतानाच एकत्र एकजीव मॅश करा.

४) एका कढईत अमूल बटर किंवा तेल गरम करा. त्यात कांदा घालून मध्यम आचेवर कांदा मऊ होईपर्यंत शिजवा.

५) आता त्यात टोमॅटोचा रस घाला आणि रस शिजेपर्यंत शिजू द्या. टोमॅटो कच्चा राहता काम नये.

६) नंतर त्यात लसूण-जिरं-मिरचीचं वाटण घाला. वाटण चांगलं होऊ द्या.

७) त्यात पाव-भाजी मसाला घालून परता. मसाल्याचा चांगला वास आला की त्यात मॅश केलेल्या भाज्या आणि मीठ घाला.

८) मॅशरनं भाजी परत एकजीव होईपर्यंत मॅश करा.

९) त्यात साधारणपणे १ वाटी पाणी घाला. कोरडं वाटलं तर अजून पाणी घाला. हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी चांगली रटरटू द्या.

१०) भाजीला चांगली वाफ आली की त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची घाला. चव बघून मसाल्याचं प्रमाण वाढवा. एक वाफ काढून भाजी बंद करा.

पाव-भाजीची भाजी तयार आहे. एका तव्यावर बटर गरम करून त्यावर अर्धे कापलेले पाव चांगले दाबून खमंग भाजा. हवं असल्यास बटरबरोबर थोडा पाव-भाजी मसाला घाला. भाजी बरोबर खमंग भाजलेले पाव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मोसम असल्यास बारीक चिरलेली कैरी किंवा लिंबू द्या.

इतकी पाव-भाजी साधारणपणे ५-६ लोकांना पुरेशी होते. वन डिश मील म्हणून पाव-भाजी करता येते. किंवा बरोबर फोडणी घातलेला दही भात केला तर पोटभरीचं जेवण होऊ शकतं.

One thought on “पाव-भाजी

  1. vangyache kap madhye ardha inch jadiche kap khup jast jad hot astil .Te pav inch jadiche purtil ase vatate.Aplya Blog vishayi Lokrangchya puravanit mahiti milali.Dr.Jawdekar hyanche he sadar va aapli hi Blog chi kalpana khupach chan.Abhinandan.Jawdekarnahi jamlyas Compliments dya.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: