चकलीची भाजणी

दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. घराघरात दिवाळीची तयारी सुरूही झालीये. आकाशकंदील, पणत्या, रंग-रांगोळी, नवीन कपडे, सुवासिक तेल-उटणं या सगळ्या खरेदीसाठी बाजार ओसंडून वाहताहेत. तर गृहिणींची फराळाच्या पदार्थांची पूर्वतयारी सुरू आहे. माझीही तयारी सुरू झाली आहे. मी फराळाचे खूप पदार्थ करत नाही कारण आमच्याकडे लाडू, अनारसे, शंकरपाळी कुणालाच फारसे आवडत नाहीत. पण चिवडा आणि चकल्या मात्र खूप आवडतात. म्हणून मी दरवर्षी चिवडा, चकल्या, थोडेसे बेसनाचे लाडू आणि थोड्या ओल्या नारळाच्या करंज्या इतकंच करते. आज मी चकलीची भाजणी केली. म्हणून आज मी चकलीच्या भाजणीची रेसिपी शेअर करणार आहे.

चकलीची भाजणी

photo 1

साहित्य: ३ वाट्या तांदूळ, १ वाटी चणा डाळ, १ वाटी मूग डाळ, १ वाटी उडीद डाळ, पाव वाटी धणे, १ टेबलस्पून जिरे

कृती:

१) सगळ्यात आधी तांदूळ धुवून त्यातलं सगळं पाणी पूर्ण निथळून घ्या.

२) गॅसवर कढई ठेवून त्यात तांदूळ घालून मध्यम आचेवर सतत हलवत तांदूळ भाजा.

३) तांदूळ भाजायला कढईत टाकले की चणा डाळ धुवून, पाणी काढून निथळत ठेवा.

४) तांदूळ संपूर्ण कोरडे होईपर्यंत भाजायचे आहेत. पण त्यांचा रंग बदलता कामा नये. लाल करायचे नाहीत. तांदूळ भाजले गेले हे ओळखण्याची खूण म्हणजे ते धुण्याआधी जसे कोरडे, सळसळीत होते तसेच ते झाले पाहिजेत.

५) तांदूळ भाजून झाले की ताटात काढा आणि चणा डाळ भाजायला टाका.

६) दुसरीकडे मूग डाळ धुवून, पाणी काढून ठेवा. चणा डाळही संपूर्ण कोरडी होईपर्यंत भाजायची आहे पण लाल करायची नाही. चणा डाळ भाजून झाल्यावर ताटात काढा.

७) आता मूग डाळ याचप्रमाणे भाजा.

८) मूग डाळ भाजायला टाकली की उडीद डाळ धुवून ठेवा. नंतर उडीद डाळही याचप्रमाणे भाजून घ्या. सगळी धान्यं नीट भाजली गेली पाहिजेत म्हणजे छान कोरडी झाली पाहिजेत पण त्यांचा रंग बदलता कामा नये.

९) शेवटी धणे-जिरे कोरडेच लाल होईपर्यंत भाजा.

१०) सगळं थंड झालं की एकत्र करा. गिरणीतून दळून आणा. दळताना ज्वारीवर दळायला सांगा.

एवढ्या साहित्यात साधारण एक किलो धान्याचं पीठ होतं.

ही झाली चकलीच्या भाजणीची रेसिपी. चकलीची रेसिपी लवकरच. कारण अजून मीही चकल्या केलेल्या नाहीत!

3 thoughts on “चकलीची भाजणी

  1. Hi me Anita me tumcha post nehmi vachte. Me Tumi sangitlypramane chaklichi bhajni Keli khupach Chan ani testy zalty thanks

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: