मित्र-मैत्रिणींनो या ब्लॉगला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देता त्यामुळे मला खरोखर फार आनंद होतो. हा ब्लॉग रेसिपीज शेअर करण्यासाठीच आहे त्यामुळे तुम्ही त्या जरूर शेअर करा. फक्त जेव्हा तुम्ही या रेसिपीज Facebook आणि Whatsapp सारख्या सोशल नेटवर्किंगमधे शेअर कराल तेव्हा त्यात या ब्लॉगचा उल्लेख नक्की करा.
मी या ब्लॉगवरच्या रेसिपीज सादर करण्यासाठी मनापासून कष्ट घेते त्यामुळे निदान ब्लॉगचा उल्लेख करून तुम्ही त्या शेअर कराव्यात अशी अपेक्षा आहे. नाव वगळून आणि केवळ कट-पेस्ट करून पोस्ट्स शेअर करू नका अशी कळकळीची विनंती आहे.
या सगळ्याची पार्श्वभूमी अशी आहे – एका बाईंनी आपल्या फेसबुक पेजवर नाश्त्याच्या पदार्थांच्या यादीची पोस्ट माझं किंवा माझ्या रेसिपी पेजचं किंवा या ब्लॉगचं नाव न घेता शेअर केली. त्यावर आलेल्या कॉमेंट्सना उत्तर देतानाही त्यांनी कुठेही याचा उल्लेख केला नाही. अन्न हेच पूर्णब्रह्मच्या एका मैत्रिणीनं त्यांना याबाबत टोकल्यावर त्यांनी नंतर ही पोस्ट फॉरवर्ड होता म्हणून सारवासारव केली. असे प्रकार होऊ नयेत म्हणून फक्त ही विनंती.
असे काही प्रकार तुम्हालाही कळाले तर मला त्याबद्दल नक्की माहिती द्या.
या ब्लॉगच्या रेसिपीज शेअर करण्यासाठीच आहेत तेव्हा बिनधास्त शेअर करा. अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा. तुमच्याही रेसिपीज कळवा आपण त्याही शेअर करू. फक्त ब्लॉगचा उल्लेख मात्र आवर्जून करा.
प्रिय सायली,
या ब्लाॅग साठी खूप आभार. तुम्ही दिलेल्यांपैकी मी बरेच पदार्थ केले किंबहूना केवळ या ब्लाॅग मुळेच करून बघायची हिंमत करू शकले. रोजचा स्वयंपाक जेमतेम झेपणारी मी, आता स्वयंपाक घरात बरेच प्रयोग करते 😀.. आवड निर्माण करण्यासाठी खूप खूप आभार🙏🏻
LikeLike
मनापासून आनंद झाला हे वाचून शलाका. 🙂
LikeLike
Hi Dear Madam,
Khup chhan v systematic easy ashi language aahe khup khup aabhar mahitisathi . i am speechless
LikeLike