कोथिंबीर वडी

हिवाळा संपला असला तरीही बाजारात अजून कोथिंबीर चांगली मिळते आहे. कुठलाही तिखट पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्ण वाटतो. कोथिंबीर घातली की पदार्थाला कसं सुंदर रंगरूप येतं. विशेषतः पिवळ्या रंगाच्या पदार्थांवर तर कोथिंबीर घालायलाच हवी. या दिवसांत मिळणा-या विपुल कोथिंबिरीचा वापर आपण सगळेच जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो. मला स्वतःला कोथिंबीर पराठे, वैदर्भीय पुडाची वडी किंवा बाकर वडी, कोथिंबिरीचा भात हे पदार्थ तर आवडतातच. शिवाय कोथिंबीर वडीही आवडते. मुंबईकडे बहुतेक ठिकाणी मिळते ते कोथिंबीर वडी म्हणजे पिठल्याची वडी असते. या वड्यांमध्ये कोथिंबिरीचं प्रमाण कमी आणि बेसनाचं प्रमाण जास्त असतं. अशा वड्या मला अजिबात आवडत नाहीत. कोथिंबीर वडी कशी खुसखुशीत असायला हवी. त्यात कोथिंबिरीचा पुरेपुर स्वाद उतरायला हवा. विशेषतः वडीच्या बाहेरच्या भागातली तळलेली कोथिंबीर तर काय अफलातून लागते! आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे कोथिंबीर वडीची. ही रेसिपी अतिशय झटपट होते. तुम्ही सगळेच ती करत असणारच इतकी ही रेसिपी लोकप्रिय आहे.

कोथिंबीर वडी

11077922_351940451679347_6412241768153786661_o

साहित्य – १ मोठी जुडी कोथिंबीर, साधारणपणे २ वाट्या बेसन (साधारण यासाठी म्हणते आहे की कोथिंबिरीची जुडी किती मोठी आहे त्यावर हे प्रमाण अवलंबून ठेवा), अर्धा टीस्पून हळद, प्रत्येकी २ टीस्पून तिखट, धणे पूड, जिरे पूड, १ टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून साखर, १ टीस्पून तेल, मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल

कृती –
१) कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवा आणि कोरडी होण्यासाठी स्वच्छ पंचावर पसरून ठेवा.

IMG_4766
२) कोथिंबिरीतलं पाणी पूर्ण सुकलं की मग ती बारीक चिरून घ्या. त्यात हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, साखर, मीठ, तीळ असं सगळं घाला.
३) चांगलं एकजीव करून पंधरा मिनिटं बाजुला ठेवून द्या. जरा वेळानं हे मिश्रण ओलसर होईल.
४) आता त्यात बेसन घाला. बेसन या मिश्रणात मावेल तसं कमीजास्त करा. गरज असल्यास थोडंसं पाणी घालून पीठ भिजवा. साधारणपणे भाकरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवा. त्याला १ टीस्पून तेलाचा हात लावून त्याचे रोल करून घ्या.
५) कुकरमध्ये जरा जास्त पाणी घालून पाणी उकळायला ठेवा. कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून हे रोल त्यात ठेवा.
६) भांडं कुकरमध्ये ठेवून शिटी न लावता २० मिनिटं रोल वाफवून घ्या.
७) थंड झाल्यावर पातळ वड्या कापा.
८) तेल नको असल्यास नुसत्या उकडलेल्याही छान लागतात. नाहीतर पॅनमध्ये शॅलो फ्राय करा किंवा कढईत तेल कडकडीत तापवून मस्त तळून घ्या.

कोशिंबीर वडी तयार आहे.
या कोथिंबीरवड्यांची भाजीही छान लागते. त्यासाठी कढईत नेहमीसारखी फोडणी करा. त्यावर या वड्या कुस्करून घाला. जरा पाण्याचा हबका मारून मंद आचेवर वाफ आणा. वरून ओलं खोबरं घाला. किंवा नेहमीसारखी फोडणी करा. त्यात या वड्या घाला. थोडा चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. ३-४ वड्या कुस्करून घाला. एखादा कप पाणी घाला. थोडा काळा मसाला घाला. चांगलं उकळा. कोथिंबीर वड्यांची भाजी तयार आहे.

हे सगळे पदार्थ करून बघा आणि कसे झाले होते ते नक्की कळवा. फोटोही पाठवा.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

5 thoughts on “कोथिंबीर वडी

  1. मी करून पाहिला हा पदार्थ.नेहमी करायचे मात्र कोरडीची व्हायची वडी.ह्यावेळी पाहून केली. उत्तम झालीय.

    Like

  2. Kalach keli mi kothimbir vadi… Khup chavishta zaliy.. Thanks…khup kami jinnas vaprun pan chan jamte he tumhala… Thanks so much.

    Like

  3. मस्त कृती. सांगायची पद्धत पण एकदम सोपी. समजेल अशी. आणि वड्या तर झकासच.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: