ओल्या काजुची उसळ

ओल्या काजुची उसळ किंवा आमटी ही खास कोकणातली खासियत. मी मराठवाड्यातली असल्यामुळे मी ओले काजू पहिल्यांदा बघितले ते लग्नानंतर मुंबईत आल्यावर. मुळात मला सगळ्या सुक्यामेव्यात काजू सर्वात जास्त आवडतात. लग्न ठरल्यावर माझी आई आणि मी मुंबईला आलो होतो तेव्हा आमच्याच कॉलनीतल्या गाडगीळ मावशींनी आम्हा दोघींना जेवायला बोलावलं होतं. तेव्हा गंगाधर गाडगीळ काका अगदी चालतेफिरते होते. ते औरंगाबादला अनेकदा आमच्या घरी आलेले होते. त्यामुळे या दोघांशी आमची चांगली ओळख होती. तर गाडगीळ मावशींनी त्या दिवशी आम्हाला ओल्या काजुची अतिशय चवदार उसळ खायला घातली होती. तेव्हा मी पहिल्यांदा ओले काजू खाल्ले. नंतर काही वर्षांनी माझी मैत्रीण नीलिमा चितळे हिनं एकदा घरी जेवायला बोलावलं होतं तेव्हा तिनं ओल्या काजुंची ब्राह्मणी आमटी केली होती. तीही फार चविष्ट झाली होती. आता मधूनमधून मी तिला परत जेवायला बोलवायची आठवण करत असते. सध्या ओले काजू मिळताहेत हे मी परवाच तिला सांगितलेलं आहे!

तयार उसळ
तयार उसळ

पण मी स्वतः ओल्या काजुचा कुठलाही पदार्थ कधी केलेला नव्हता. शिवाय मला स्वतःला ओल्या खोब-याचं वाटण असलेले अगदी मोजके पदार्थ आवडतात. पण अलिकडेच माझी मैत्रीण मनस्विनी प्रभुणे हिनं ओल्या काजुच्या उसळीची रेसिपी शेअर केली होती. या उसळीचे फोटोच इतके काही नेत्रसुखद होते की बघूनच तोंडाला पाणी सुटलं. शिवाय तिनं अगदी सविस्तर रेसिपी लिहिली होती. अन्न हेच पूर्णब्रह्मच्या काही मैत्रिणींनीही ओल्या काजुच्या उसळीची रेसिपी विचारली होती. मग परवा दादरहून ओले काजू आणले आणि मनस्विनीच्या रेसिपीनं ही उसळ करून बघितली. ती उत्तम झाली होती. ही रेसिपी खास गोव्याकडची आहे. या उसळीला वापरलेला मसाला लालसर रंगाचा दिसतो. पण काही सारस्वती घरांमध्ये हिरव्या मसाल्याचीही उसळ केली जाते. म्हणजे ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर वाटून ही उसळ करतात.

ओल्या काजुची उसळ

साहित्य – १५० ग्रॅम किंवा ५० काजू बिया, २ मोठे कांदे मध्यम आकारात चिरलेले, २ मोठे टोमॅटो मध्यम आकारात चिरलेले, १ मोठा बटाटा मध्यम आकारात चिरलेला, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी १ टीस्पून तेल, थोडी मोहरी, चिमूटभर हिंग, वरून घालण्यासाठी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर

वाटण मसाला
वाटण मसाला

वाटण मसाला – दीड वाटी खोवलेलं ओलं खोबरं, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला, ३ बेडगी मिरच्या, ४ लवंगा, १ लहानसा दालचिनीचा तुकडा, पाव टीस्पून हिंग ( हे सगळं मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटावं. मग त्यात अर्धी वाटी पाणी घालून अगदी एकजीव होईपर्यंत वाटून घ्यावं.)

कृती –
१) एका पातेल्यात पाणी कोमटपेक्षा थोडं जास्त गरम करा.
२) गॅस बंद करून त्यात काजूबिया घालून १५-२० मिनिटं ठेवून द्या.
३) नंतर चाळणीत उपसून घ्या. पाणी निथळलं की सालं काढा. सालं अगदी पूर्णपणे काढा नाहीतर त्यांचा कडवटपणा जाणवतो.
४) एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घालून नेहमीसारखी फोडणी करा.
५) त्यात कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. आता त्यात हळद आणि गरम मसाला घाला.
६) ते चांगलं परतून त्यात टोमॅटो घालून परता. जरासं परतून त्यात बटाट्याच्या फोडी घाला, नीट हलवून घेऊन झाकण घाला. मंद आचेवर बटाटा अर्धवट शिजेपर्यंत शिजू द्या.
७) बटाटा शिजत आला की त्यात काजूबिया घाला. परत नीट हलवून घ्या आणि त्यात साधारणपणे दीड वाटी पाणी घाला. गॅस मोठा करून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.


८) पाणी उकळलं की वाटलेला मसाला घाला. मीठ घाला. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. काजूबिया जेमतेम शिजल्या पाहिजेत नाहीतर त्यांचा लगदा होईल, शिवाय चव फार बरी लागणार नाही.
९) काजू शिजले की गॅस बंद करा. भांड्यात काढून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

काजूबियांची उसळ तयार आहे. गरम पोळ्यांबरोबर किंवा पावाबरोबर किंवा गरम भाताबरोबर खायला द्या.
अतिशय चवदार लागते. मी गरम मसाला म्हणजे मालवणी मसाला वापरला होता. तो दुकानात तयार मिळतो.
तेव्हा तुम्हीही ही करून बघा. कशी झाली होती तेही नक्की कळवा.

photo 3

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

4 thoughts on “ओल्या काजुची उसळ

 1. Hiiii sayli tai, i follow ur recipes n i like it very much. me too belong frm aurangabad but now settled in chandigarh. my hubby works here n he has to go out of India almost every month for official tour. since we both r vegetarian he found lil difficult in other countries. so whenever he goes i prepare Dashmi, Dapate etc for him. plz suggest some dishes that can b eaten for long journey in ur blog. Thank u very much

  Liked by 1 person

  1. रेणुका, धपाटे आणि दशम्यांची रेसिपी तसंच थोडा काळ टिकणा-या पदार्थांच्या रेसिपीज नक्की शेअर करेन. 🙂

   Like

 2. Batatacha papada chi recipe share kara na…वाळवणाचे पदार्थ cha sudha recipe share kara…

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: