फ्रुट सॅलड किंवा फ्रुट कस्टर्ड

पावसाळा आहे की उन्हाळाच सुरू आहे असं वाटावं इतकी पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे ऊनही कडकडीत पडतंय, उकाडाही असह्य आहे. उन्हाळ्यात जसं दुपारी थंडगार पन्हं किंवा सरबत घ्यावंसं वाटतं किंवा सतत आईस्क्रीम खावंसं वाटतं तसंच आताही वाटतंय. एक खास उन्हाळ्यात केल्या जाणा-या पदार्थाची रेसिपी शेअर करायची राहिली होती. म्हणजे ती कधीही करता येते पण उन्हाळ्यात आंबा मिळतो त्यामुळे ती अधिक चांगली लागते. आता न पडणा-या पावसानं संधी दिलीच आहे तर आज ही रेसिपी शेअर करते. आजची रेसिपी आहे फ्रुट सॅलडची. हिवाळ्यापासून उन्हाळ्यात मुबलक फळं मिळतात. विशेषतः गोड फळं या मोसमात अधिक मिळतात त्यामुळे त्यावेळी फ्रुट सॅलड अधिक चांगलं लागतं. ज्या फळांना कमी पाणी असलेला गर असतो ती फळं फ्रुट सॅलडमध्ये अधिक चांगली लागतात. उदाहरणार्थ – आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्षं, केळी, सफरचंद इत्यादी. ज्या फळांमध्ये खूप पाणी असतं किंवा ज्यांची चव आंबट, तुरट असते अशी फळं फ्रुट सॅलडमध्ये चांगली लागत नाहीत. उदाहऱणार्थ – कलिंगड, खरबूज, पेरू, जांभळं, पीच इत्यादी. शिवाय पपई, अंजीर आणि अननस ही फळं दुधात घातलीत की तो पदार्थ कडू होतो, त्यामुळे ही तीन फळं टाळावीत. अननस घालायचाच असेल तर टीनमधला घालावा.

IMG_5190

फ्रुट सॅलड

साहित्य – १ लिटर दूध, ४-५ टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, ५-६ टीस्पून साखर, ४ आंबे, ३ चिकू, २ सफरचंद, १ संत्रं, १ मोसंबी, १५-२० द्राक्षं, १ वाटी डाळिंबाचे दाणे, आवडत असल्यास १ केळं,
वरून घालायला थोडे बदामाचे, काजूचे काप आणि थोडे बेदाणे (हे सगळं ऐच्छिक आहे)

कृती –
१) दूध गॅसवर उकळायला ठेवा. त्यात साखर घाला.
२) कस्टर्ड पावडर एका कपात घेऊन थोडं थंड दूध घालून त्याची एकजीव पेस्ट करा.
३) दुधाला उकळी आली की गॅस बंद करून त्यात ही पेस्ट घाला. चांगलं एकजीव मिसळून घ्या. पातेलं परत गॅसवर ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटं शिजू द्या. (कस्टर्ड पावडरच्या पाकिटावर सगळ्या सूचना दिलेल्या असतात)
४) तयार कस्टर्ड थंड करा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा.
५) थंड झाल्यावर त्यात दोन आंब्यांचा रस काढून घाला. हँड मिक्सरनं फिरवून घ्या.
६) संत्री आणि मोसंबीची सालं काढून फोडी काढा. फोडींवरचा पापुद्रा काढा. आतल्या गराचे लहान तुकडे काढून बाजूला ठेवा. द्राक्षाचे तुकडे करा. केळ्याच्या चकत्या करून त्यांचे चार तुकडे करा.
७) चिकूची सालं काढून आतला गर बारीक चिरून घ्या. आंब्याची सालं काढून आतल्या गराचे चौकौनी तुकडे करा. सफरचंदाची सालं काढून मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा.
८) तयार कस्टर्डमध्ये आंबा, चिकू, केळं, सफरचंद यांच्या फोडी घाला, डाळिंबाचे दाणे घाला. मस्त गार होऊ द्या.
९) संत्रं-मोसंबी आणि द्राक्षं वेगळी गार करायला ठेवा. देताना कस्टर्डमध्ये घाला.
१०) हवा असल्यास सुकामेवा घाला. आणि मग मस्त गारेगार फ्रुट सॅलड खा.

संत्रं-मोसंब आणि द्राक्षं आधीच मिसळलं तर फ्रुटसॅलडला जास्त पाणी सुटतं म्हणून ही फळं ऐनवेळेला घाला. ज्या मोसमात जी फळं उपलब्ध असतील ती घालून फ्रुट सॅलड करता येतं. कस्टर्ड पातळ असायला नको. ते घट्ट हवं. त्यानुसार पावडर कमी-जास्त करा.
तुम्ही करत असालच पण परत करा. कसं झालं ते कळवा.

सायली राजाध्यक्ष

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s