रिनोवेशन रिनोवेशन!

img_3357

किचनचं काम अजून सुरूच आहे. त्यामुळे अक्षरशः वार लावून जेवतो आहोत! शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी माझी मैत्रीण यशोदा हिच्याकडे रोज नाश्त्याला जातो. ती रोज साग्रसंगीत नाश्ता करते. इतकं खायला देते की कधीकधी दुपारच्या जेवणाचीही गरज पडत नाही. माझ्याकडे काम करणा-या राणीनं काही दिवस सकाळचं जेवण तिच्या घरून आणलं. माझ्या नव-याला आवडतं म्हणून चिकनही करून आणलं आणि मला आवडतात म्हणून काही चमचमीत भाज्या.  काही दिवस रात्री माझ्या सासुबाईंच्या घरी जेवायला गेलो. पण मग कंटाळा आला रोज उठून जाण्याचा. म्हणून कालपासून वर माझ्या नणंदेच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये स्वयंपाक करायला सुरूवात केली. अर्थात या घरातलं स्वयंपाकघर रोजच्या वापरात नाही कारण हा फ्लॅट बंद असतो. शिवाय आमचं सगळं सामान सध्या धूळ खात पडलेलं आहे. म्हणून सध्या रोज रात्री काहीतरी साधंच खायला करायचं असं ठरवलेलं आहे. त्यानुसार काल रात्री मी पुलाव, दही बुंदी आणि भाजलेले पापड असा मेन्यू केला होता. खरं सांगते, इतक्या दिवसांनी आम्ही चौघांनी एकत्र बसून केलेलं ते जेवण इतकं छान वाटलं. आज रात्रीसाठी मी वन बोल मील म्हणून वरणफळं केली आहेत. गरमागरम वरणफळं मला आणि माझ्या मुलींना, शिवाय सासुबाईंनाही खूप आवडतात. म्हणून आज त्यांनाही पाठवणार आहे.

तर सध्या असं सुरू आहे. दिवसभर कामगार असतातच. घरभर धूळ पसरलेली आहे. शिवाय टाईल्स कटिंग आणि फर्निचर कटिंगचा प्रचंड आवाज असतो. आज काय टाईल्स निवडायला जायचंय, उद्या काय ड्रॉवर्सचे चॅनल्स आणायचेत, आज काय एसीचं पायपिंग बदलायचंय, असं काही ना काही रोज सुरू असल्यानं मनात असूनही तुमच्यासाठी काही लिहू शकत नाहीये. पण येत्या काही दिवसांत काही तरी नक्की लिहीन. तेव्हा तुमची आठवण मला सतत येत असते हे लक्षात असू द्या.

One thought on “रिनोवेशन रिनोवेशन!

  1. Hi Sayali ,Mi savita joshi Telkikar(pallavi shiradhonkarchi maitrin)1986 te 1991 amhi Aurangabadla Jainagar( MSEB officechya varchya majalyavar) madhe rahat hoto nantar 1993 pasun lagnanantar Mi thanyat ahe.Tumchya ghari Ram Marathyanchya sangit baithakit sahbhagi hote.Tuze Anna he purnbrahma vachun khup chan vatale,Aurangabad va marathwadi padarth vachun manane agdich jawal pochle.Khup kautukaspad upkram ahe.Tyacha pasara asach vadhat jao hi shubheccha ,mala hi vegvegle padarth karun lokana khayala ghalayala awadtat.Hahi ek jawalkicha bhag.Mihi tula kahi receipies share karin.Ek request ahe less oil pan paushtik asha kahi diet receipies including soups,broth,one meal dish etc.asha receipech publish kar arthat tuzya soyine kar.Mi fbvar friend request takliye tula,Telkikar adnavamule kadachit lakshat ale nasel.Medha kamatkar joshi mazi vahini ahe.Lavkarach Bhetuya.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: