माझी बहीण मेघन औरंगाबादला असते. ती सध्या मुंबईत आली आहे. दुसरी बहीण भक्ती मुंबईतच मुलुंडला असते. तीही आज माझ्या घरी आली होती. दिवसभर गप्पा, खाणं आणि हसणं अशी मजा केल्यावर शेवटी बांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्समधल्या स्टार बक्सला गेलो. काॅफी घेत परत निवांत वेळ घालवला.