परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २

13055512_530366020503455_2222730559739628549_nअति थंड देशांमध्ये राहणा-या भारतीयांना आपण भारतात रोज ज्या भाज्या खातो त्या ब-याचदा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे विशेषतः त्यांच्यातल्या शाकाहारी लोकांचे हाल होतात. पण कामानिमित्त राहात असतील तर तिथे जे मिळतं त्यातच पर्याय शोधायला हवेत. अन्न हेच पूर्णब्रह्मची जर्मनीतली मैत्रीण पल्लवी औसेकर-कुलकर्णी हिनं मला हॅम्बुर्गमध्ये कुठल्या भाज्या सहज उपलब्ध आहेत ते कळवलं होतं आणि त्यातून काय काय करता येईल हे सुचवायला सांगितलं होतं. याआधीच्या पोस्टमध्ये मी कोशिंबीरी आणि भातांचे काही प्रकार लिहिले होते. आज त्याच पोस्टचा पुढचा भाग.
ज्यांनी आधीचा भाग वाचला नसेल त्यांच्यासाठी तिथे कुठल्या भाज्या मिळतात हे परत लिहिते आहे – मोठी निळी वांगी, गाजरं, ब्रॉकोली, दुधी भोपळा, टोमॅटो, कांदे, बटाटे, कांदा पात, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची

 

काही भाज्यांचे प्रकार

वांग्याची रस्सा भाजी – वांग्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. तसेच तुकडे कांद्याचेही करा. तेलाची नेहमीसारखी मोहरी-हिंग अशी फोडणी करा. त्यात कांदा परता. कांदा परतला की हळद घाला. वांग्याचे तुकडे घाला. नीट हलवून घ्या. त्यात दाण्याचं कूट, तिळाचं कूट, मीठ, तिखट, काळा मसाला आणि आवडत असल्यास गूळ घाला. वरून कोथिंबीर घाला.
वांग्याची रस्सा भाजी २ – १ कच्चा कांदा आणि लसणाच्या ७-८ पाकळ्या मिक्सरला फिरवा. त्यात थोडा दाण्याचा कूट, थोडा तिळाचा कूट, काळा मसाला, तिखट, हळद, धणे-जिरेपूड, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून परत फिरवा. मीठ घाला. तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यात वांगी परता. त्यात हा मसाला घालून चांगलं परता. झाकण घालून थोडी वाफ येऊ द्या. नंतर थोडं गरम पाणी घालून भाजी शिजवा. वरून कोथिंबीर घाला.
वांग्याचं भरीत – वांगं तेलाचा हात लावून गॅसवर भाजा. थंड झाल्यावर साल काढून गर चांगला मॅश करा. त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर घाला. वरून हिंग-मोहरी-लाल तिखट अशी फोडणी द्या.
वांग्याचं भरीत २ – वांगं तेलाचा हात लावून भाजा. थंड झाल्यावर साल काढून गर चांगला मॅश करा. त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा, मीठ, साखर आणि कोथिंबीर घाला. दही घालून कालवा. वरून सांडग्या मिरचीची खमंग फोडणी द्या.
वांग्याचं भरीत ३ – वर लिहिल्याप्रमाणेच गर मॅश करून घ्या. तेलाची फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परता. त्यातच लसणाच्या ७-८ पाकळ्या ठेचून घाला. तेही चांगलं परता. त्यात थोडासा सुक्या खोब-याचा कीस, आवडत असल्यास अख्खे शेंगदाणे घालून परता. त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात घाला. जरा वेळ शिजू द्या. मीठ आणि वांग्याचा गर घालून एक वाफ आणा. (नुसत्या लसणाऐवजी लसूण-मिरचीची पेस्टही वापरू शकता)
वांग्याचं भरीत ४ – तेलाची फोडणी करा. मोहरी नावापुरतीच घाला. बारीक चिरलेला कांदा परता. त्यात थोडी आलं-लसणाची पेस्ट घाला. चांगला खमंग वास आला की थोडं लाल तिखट घाला. परता. नंतर त्यात वांग्याचा गर घाला. थोडा पावभाजी मसाला घाला. खाताना वरून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला.
गाजराची भाजी – ही भाजी माझ्या आजोबांना आवडायची. गाजराचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. तेलाची हिंग-मोहरी-हळद अशी फोडणी करा. त्यात गाजराचे तुकडे घालून हलवा आणि झाकणावर पाणी ठेवून जरासे शिजू द्या. नंतर त्यात तिखट, मीठ आणि का-हळाचं कूट घाला. थोडंसं लिंबू पिळा.
गाजराची भाजी – थोडी मूगडाळ भिजवा. नेहमीसारखी फोडणी करा. त्यात मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. त्यावर गाजराचे तुकडे, भिजवलेली मूगडाळ घाला. चांगलं हलवा. त्यात मीठ,तिखट घाला. चांगलं शिजू द्या. शिजत आली की त्यात थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला.
ब्रॉकोली-कॉर्न भाजी – थोड्या बटरवर ब्रॉकोलीचे तुकडे घालून जरासे वाफवून घ्या. कॉर्न दाणे उकडून घ्या. ब्रॉकोली शिजली की त्यात कॉर्न दाणे, साखर, मीठ घाला. असल्यास एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घाला. नसल्यास थोडा गरम मसाला घाला. छान वाफ येऊ द्या. हवं असल्यास पाव कप दूध घालून शिजवा. ही भाजी ब्रेडबरोबरही खाता येईल किंवा भाताबरोबरही.
दुधीची भाजी – दुधीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. थोडी मूग डाळ किंवा हरभरा डाळ/ चणा डाळ भिजवा. तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. ४-५ कढीपत्त्याची पानं घाला. त्यावर दुधीचे तुकडे, मूगडाळ घाला. नीट हलवून त्यात तिखट, मीठ, चिमूटभर साखर घाला. झाकणावर पाणी ठेवून भाजी चांगली शिजू द्या. वरून थोडं ओलं खोबरं-कोथिंबीर घाला.
दुधीची भाजी २ – दुधीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. कढीपत्त्याची ४-५ पानं घाला. त्यावर दुधीचे तुकडे घाला. नीट हलवून त्यात काळा मसाला, दाण्याचं कूट, मीठ आणि लहान बोराएवढा गूळ घाला. थोडंसं गरम पाणी घालून भाजी चांगली शिजू द्या.
टोमॅटो भाजी – टोमॅटोचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. तेलाची फोडणी करा. त्यात मध्यम आकरात चिरलेला कांदा घालून मऊ होऊ द्या. त्यावर टोमॅटोचे तुकडे घाला. नीट हलवून मीठ, साखर, तिखट आणि तिळाचं किंवा दाण्याचं कूट घाला. मऊ शिजवा. ही भाजी किंवा चटणी पोळी-पराठे किंवा ब्रेडबरोबरही छान लागते.
बटाटा-कांदा-टोमॅटो रस्सा – बटाट्याचे (साल काढून), कांद्याचे आणि टोमॅटोचे मोठे चौकोनी तुकडे करा. तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यात ४-५ कढीपत्त्याची पानं घाला. कांदा घाला. चांगलं परता. त्यातच थोडी आलं-लसणाची जाडसर पेस्ट घाला. मस्त वास येईपर्यंत परता. मग टोमॅटो घाला. कच्चा वास जाईपर्यंत परता. नंतर त्यात बटाट्याचे तुकडे, दाण्याचं कूट, तिखट, काळा मसाला, मीठ आणि बोराएवढा गूळ घाला. छान परतून घ्या. आपल्याला रस्सा हवा असेल त्या प्रमाणात गरम पाणी घाला. भाजी चांगली मऊ शिजू द्या. शिजतानाच भरपूर कोथिंबीर घाला. कुकरला तर ही भाजी अगदी झटपट होते.


उकडलेल्या बटाट्याची भाजी – बटाटे उकडून मध्यम आकाराच्या फोडी करा. तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यात थोडी उडदाची डाळ आणि ४-५ कढीपत्त्याची पानं घाला. नंतर त्यात मध्यम आकारात चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परता. त्यावर आलं-मिरचीची पेस्ट घालून चांगलं परता. नंतर त्यात मीठ,थोडी साखर, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली बरीचशी कोथिंबीर घालून परता. सगळं मस्त परतलं की त्यात बटाटे घाला. चांगलं हलवून एक वाफ येऊ द्या. (या भाजीला आलं-मिरची जरा जास्त घातलेलं छान लागतं.)
बेबी पटेटोज भाजी – अगदी लहान बटाटे मिळतात ते उकडून घ्या. सालं काढा. एका नॉनस्टिक पॅनमध्ये जरा जास्त तूप घाला. ते गरम झालं की भरपूर जिरं घालून तडतडू द्या. त्यावर जरा जास्त लाल तिखट आणि मीठ घाला. हे बटाटे घाला. मध्यम आचेवर सगळ्या बाजूंनी चांगले लाल होईपर्यंत परता. ही भाजी ऐनवेळी करा म्हणजे बटाटे कुरकुरीत लागतील. दालफ्राय-जिरा राईस आणि ही भाजी असा मेन्यू मस्त लागतो. (ही भाजी उपासालाही चालेल आणि स्टार्टर म्हणूनही)
कोबीची भाजी – कोबी लांब पातळ चिरा. थोडी मूगडाळ भिजवा. तेलाची फोडणी करा. त्यावर उडदाची डाळ आणि कढीपत्त्याची पानं घाला. त्यावर कोबी घाला. भिजवलेली डाळ घाला. नीट हलवून घ्या. साखर-मीठ घालून जरासा शिजू द्या. ही भाजी फार शिजवायची नाही. शिजत आली की त्यावर ओलं खोबरं-कोथिंबीर घाला. आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस घाला.
कोबी-सिमला मिरची भाजी – कोबी लांब, पातळ चिरा, सिमला मिरचीचेही लांबट,पातळ तुकडे करा. तेलाची फोडणी करा. त्यावर कोबी आणि सिमला मिरची घाला. जराशी शिजू द्या. नंतर त्यात थोडा काळा मसाला, दाण्याचं कूट आणि मीठ घाला. भाजी फार शिजवू नका. कारण नाहीतर सिमला मिरचीचा उग्र वास येतो. एक मध्यम कोबीचा गड्डा असेल तर दोन लहान सिमला मिरच्या घ्या.

आणखी काही पदार्थ पुढच्या पोस्टमध्ये.

ही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
तुम्ही आता मला Instagram वर sayaliniranjan या आयडीवर फॉलो करू शकता.

सायली राजाध्यक्ष

5 thoughts on “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २

 1. सुंदर लेख ..किती मस्त लिहिता तुम्ही …पदार्थ अगदी लगेच बनवून खावेसे वाटतात
  …मी कधीही किचन मधे जात नाही मला काही बनवता येत नाही… पण तुमच्या BLOG मुळे
  मी आता पदार्थ बनवणार आहे means I’ve decided to learn cooking by
  myself….also It wil b great surprise to my wife ..as she always
  says..तुला काय येतय स्वयंपाक करायला…तू फक्त खायच्या कामाचा आहेस … पण काही
  दिवसातच मी तिला तुमच्या blog वरील एक तरी recipe करून खायला देणार… नक्की… &
  all credit will be yours n yours blog…so keep on the good work..best
  wishes..

  सुनिल सरदेसाई
  Jogeshwari- Mumbai.

  2016-04-22 19:58 GMT+05:30 “अन्न हेच पूर्णब्रह्म” :

  > sayalirajadhyaksha posted: “अति थंड देशांमध्ये राहणा-या भारतीयांना आपण
  > भारतात रोज ज्या भाज्या खातो त्या ब-याचदा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे
  > विशेषतः त्यांच्यातल्या शाकाहारी लोकांचे हाल होतात. पण कामानिमित्त राहात
  > असतील तर तिथे जे मिळतं त्यातच पर्याय शोधायला हवेत. अन्न हेच पूर्णब्रह्”
  >

  Like

 2. khupch sundar aani titkach upyogi blog….padarth suchi madhle bahutek padarth me karate….aani recipes compare kelya tari suddha kiti navin shikata yet he tumchya blog mule samajal….so thnx for that and keep the good work going….best wishes…..

  Like

 3. Hi
  I am Ujwal here .
  Being stayed in Germany for many years and as a Linguist hy profession , i have been doing a lot of projects in the field of Intercultural Sensatization . One of my well appreciated project by Foriegners is learning a language along with regional culinary specializations in my German or Bangalore Kitchens .
  i am currently working on a cook book about Indian Cusine in German & strongly feel that meeting you could give an unique feel to my project .
  i am a follower of your FB Pages too .
  my email id is
  Ujwal.viva@ gmail.com

  my email id

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: