वाचकांचा प्रतिसाद

world-map-classroom-rug_lg

काही दिवसांपूर्वी मी ब्लॉग डॉक्युमेंटेशनबद्दल एक पोस्ट लिहिली होती. अन्न हेच पूर्णब्रह्मचे वाचक कुठेकुठे आहेत ते जाणून घेण्याची इच्छा होती. त्यामुळे आपण ज्या गावात आणि देशात राहता त्या गावाचं आणि देशाचं नाव कॉमेंटमध्ये लिहा असं आवाहन मी केलं होतं.
अन्न हेच पूर्णब्रह्मची प्रत्येक पोस्ट निदान ३०००० ते १००००० लोक वाचतात. पेज लाइक्स आता जवळपास २८००० च्या आसपास आहेत. हे लक्षात घेता या पोस्टला ज्या हजाराच्या आसपास कॉमेंट्स आल्या त्यातली माहिती मला फारच भारावून टाकणारी वाटली. कारण २०१४ च्या जुलै महिन्यात हा ब्लॉग सुरू केला. तेव्हा फक्त मित्र-मैत्रिणीच तो वाचत होते. नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढली. लोकांचा प्रतिसाद वाढला. त्यामुळे मला ब्लॉगचं डॉक्युमेंटेशन करावंसं वाटलं. ही माहिती तुमच्याबरोबरही शेअर करते आहे. तुम्हालाही ती वाचताना मजा येईल.
भारतात बघितलं तर महाराष्ट्रातल्या कित्येक लहानमोठ्या गावात ब्लॉगचे वाचक आहेत. मला हे फार फार मोलाचं वाटतं. कारण शहरांमध्ये इंटरनेट सहज उपलब्ध असतं, त्याचा वापर कसा करायचा हे माहीत करून घेणं सहज शक्य असतं. पण जिथे हे सहजासहजी शक्य नसतं तिथे लोकांनी माझ्या ब्लॉगला अक्सेस करणं मला महत्वाचं वाटतं.
भारतात ब्लॉगचे सर्वाधिक वाचक माझ्या आवडत्या शहरातले म्हणजे पुण्यातले आहेत. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण (या जिल्ह्यांमधली बहुसंख्य उपनगरं आणि गावं), अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अकलूज, सांगली, कोल्हापूर, विटा, कणकवली, नाशिक, यवतमाळ, नरसी नायगाव, पनवेल, अमरावती, धुळे, देवपूर, रत्नागिरी, भुसावळ, नेवासा, अलिबाग, अंबेजोगाई, बारामती, सांगोला, तळेगाव, परभणी, नागपूर, नांदेड, चिपळूण, बोईसर, परळी वैजनाथ, लोणावळा, गारगोटी, जामनेर, राधानगरी, चाकण, मेहकर, मिरज, निफाड, कराड, श्रीरामपूर, वर्धा, साकुरी, शिर्डी, आंबेगाव, मालवण, वनगाव, इस्लामपूर, रोहा, पिंपळे गुरव, बांदा, अकोला, जळगाव, बसणी, जेजुरी, मुंगसारा, खामगाव, महाबळेश्वर, वारूड, दोंडाइचा, वाई, मौदा, फलटण, मालवण, त्र्यंबकेश्वर, कुरूंदवाड, सावंतवाडी, लासलगाव, कडेगाव या गावांमध्ये ब्लॉगचे वाचक आहेत.
भारतातल्या इतर राज्यांमधल्या गावांमध्ये मध्य प्रदेशात ग्वाल्हेर, इंदौर, सौसर, भोपाळ, बु-हाणपूर ही गावं, तेलंगणात हैदराबाद, निजामाबाद, गुजरातेत राजकोट, वापी, बडोदा, अहमदाबाद, बलसाड, नवसारी ही गावं, गोव्यात मडगाव, पोंडा, वास्को, म्हापसा ही गावं, झारखंडमध्ये जमशेदपूर, रांची, छत्तीसगढमध्ये बिलासपूर, बंगालमध्ये कोलकाता, कर्नाटकात बंगलोर, म्हैसूर, अथनी, बेळगाव, शाळिग्राम-उडुपी, निपाणी, राजस्थानात उदयपूर आणि बिकानेर, तामिळनाडूत चेन्नई आणि पट्टुकोडाई, कोईमतूर उत्तर प्रदेशात कानपूर, नवी दिल्ली, हरियाणात गुडगाव, सिल्वासा, पंजाबातलं जालंधर, जम्मूमधलं नागरोटा ह गावं इथून लोकांनी ब्लॉग बघतो असं कळवलं आहे.
परदेशात हा ब्लॉग अर्थात सगळ्यात जास्त अमेरिकेत वाचला जातो. सिएटल, फॉल्सम, शिकागो, प्रिन्स्टन, सिनसिनाटी, डेट्रॉइट, सेंट लुईस-मिसुरी, सॅन रामोन, ओम्हा-नेब्रास्का, बेलमाँट, बॉईस इडाहो (उच्चार असाच असावा बहुधा), Brye Mawr, सँटा क्लारा –सॅन होजे, ट्रॉय मिशिगन, डब्लिन- ओहायो, पोर्टलंड, डेंटन-टेक्सस, न्यूजर्सी, फोर्ट कॉलिन्स, ग्रीन्सबरो, ब्लुमिंग्टन-इलिनोवा, जॅक्सन-मिसिसिपी, प्रेअरीविल-लुईजिआना, आर्लिंग्टन, स्टॅमफर्ड-कनेक्टिकट, ब्रॅमब्लिटन-व्हर्जिनिया, कोलंबस-ओहायो, मिनियापोलिस-मिनिसोटा, फिलाडेल्फिया, एडिसन-न्यूजर्सी, अशबर्न, सेंट जोसेफ-मिशिगन, कॅरी, अटलांटा, न्यूयॉर्क, मार्को आयलंड-फ्लोरिडा, बॉस्टन, कोलंबस-इंडियाना, फार्मिंग्टन हिल्स –मिशिगन, बरबँक-लॉसएंजेलिस, शार्लट-नॉर्थ कॅरलिना, सॅन डिएगो, ह्यूस्टन, बेलव्यू-वॉशिंग्टन, डलास-टेक्सस, इंडियाना पोलिस, शॉर्ट हिल्स-न्यूजर्सी, रेडमाँड-सिएटल, अर्बाना-कँपेन-इलिनोआ, क्लिव्हलँड-ओहायो, मॉरीरविल-नॉर्थ कॅरलिना या गावांमध्ये ब्लॉग बघितला जातो.
इंग्लंडमध्ये क्रॉली, बर्नमाऊथ, हार्लो, फार्नबरो-लंडन, ब्रिस्टल, न्यू कासल, लंडन, ग्रीनवीच, अबरदीन-स्कॉटलंड, मँचेस्टर, एडिंबरा-स्कॉटलंड या गावांमध्ये वाचला जातो. कॅनडात टोरंटो, मिसिसॉगा-ओंटारियो, मिल्टन-ओंटारियो, व्हँकूव्हर, कॅलगरी या गावांमध्ये तर ऑस्ट्रेलियात पर्थ, सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न, एडलेड या शहरांमध्ये ब्लॉग बघितला जातो. जर्मनीत लिंगेन, डसेलडर्फ, म्युनिक, बॉन, हॅम्बर्ग या शहरांमध्ये ब्लॉग वाचला जातो.
स्कँडेनेव्हियात ऑस्लो-नॉर्वे, स्टॅव्हेन्जर-नॉर्वे, स्टॉकहोम-स्वीडन या गावांमध्ये, तर नेदरलँड्समध्ये अमस्टरडॅम, डेलफिट, एमस्टलविन या शहरांमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये झुरिक, आखातात जेद्दा- सौदी अरेबिया, रस अल खैमा- युएई, ओमान –मस्कत, शारजाह –यूएई, दुबई- यूएई, निझवा-ओमान, अबुधाबी, बहारीन, अलनदाह-शारजाह, दोहा-कतार, जुबैल-सौदी अरेबिया, मलोशियात क्वालालंपूर, इपोह-पेराक या गावांमध्ये ब्लॉग वाचला जातो. शिवाय हाँगकाँग, न्यूझीलंड आणि इस्त्रायलमध्येही ब्लॉग वाचला जातो.
काही इंटरेस्टिंग शहरांची नावं अशी आहेत – रिओ –ब्राझील, लागोस-नायजेरिया, बामको-माली-वेस्ट आफ्रिका, माहे आयलंड-सेशल्स, ग्वाडालायारा-यॅल्सिको-मेक्सिको, डर्बन-दक्षिण आफ्रिका, क्वाला बेलेत-ब्रुनेई-दारूस्लाम, यंगून-म्यानमार, सोल-दक्षिण कोरिया, नैरोबी-केनिया, टोकिओ-जपान, दारेसलाम-टांझानिया!
ही सगळी माहिती मी फक्त १००० कॉमेंट्सवरून गोळा केली आहे. याशिवायही कित्येक गावांमध्ये आणि शहरांमध्ये ब्लॉग वाचला जातो. जर तुम्हाला जाहीररित्या सांगायचं नसेल तर मला इनबॉक्समध्ये जरी तुमच्या गावाबद्दल माहिती दिलीत तर मला ती एकत्रित करायला बरं पडेल.

या सगळ्या प्रचंड प्रतिसादामुळे ब्लॉग लिहिण्याचा माझा उत्साह दुणावतो. काही दिवस लिहिता आलं नाही तर मी अस्वस्थ होते. वेळेवर पोस्ट लिहिणं मला माझी जबाबदारी वाटते. आणि हे सगळं गेल्या पावणेदोन वर्षांत घडलेलं आहे. कधीकधी माझाच विश्वास बसत नाही!

सायली राजाध्यक्ष

10 thoughts on “वाचकांचा प्रतिसाद

  1. Hi
    Mi Mrunmai
    Mi kuwait madhe rahate Ani regularly tuza blog mails saggal vachate. Ani kharach khup chan vatat vachalyawar.
    Mazya ithalya baryach maitrini na tuzya blog vishayi mahiti pan dilye.
    Keep it up
    Thank you
    Mrunmai

    Sent from my iPhone

    >

    Like

  2. Hi Sayli Didi,
    Mi Sadiccha
    mi Pune chi ahe pan sadhya mi Tirupur Tamilnadu madhe rahte..
    Mi tumche blog nehmi vachte khup chhan astat… Mahiti pan barich milte.
    Receipe pan ekdum mast ahet.
    Mi aajach dhokla kela hota, khup chhan spoongy ani tasty zala hota tyamule photo kadhayche lakshatach nahi rahile. Special mazya husband la khup awadla dhokla..
    Cooking hi mazi hobby asalyamule mala sarakh kahi na kahi navin karayla lagat. Ani he ata tumachyamule shakya hot ahe.
    asach navin mahiti lihit ja ani receipe post kara.
    Thank u Didi.

    Like

  3. Hi, Sayali tai
    Me Arundhati, Lund Sweden madhe rahte. Me Tumche donhi blogs nehmi wachate.
    Mala tumche blogs wachale ki bhartatil athwani jagya hotat. Mala tumcha blog wishayi maza tai kadun ( Shruti Shirgurkar) kalale. Tumcha blogs mule junya athwani madhe maza diwas chaan jato

    Like

  4. mala khup aawadlele jevha majhya vaachnaat ha blog aala. kitinda tari vachale tarihi pun punha vachavese vatate, ekhadya pustakasarkhe

    Like

  5. अभिनंदन सायलीजी, आपला ब्लॉग कोटीच्या कोटी वाचकसंख्येचा टप्पा ओलांडो हीच सदिच्छा.. आपलं साद
    रीकरण पदार्थांइतकेच देखणे आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

    Like

  6. Hi सायली, I am a regular reader of all ur blogs and fb pages – anna he poorna brahma and saadi aani barrach kaahi…
    Love your styles and ur writings and recipes too.
    V. Natural flair but v. Informative…..
    Keep it up…
    All the best

    Like

  7. Hi Sayali!

    This is Aparna, Milind’s sister. Writing to you from Toronto. I am back home now. Remember we met during the cast and crew screening of “Gulabjam”? That is when you told me about your blog!
    I have become a fan of your blog now. You write so well…agadi samor basun gapps marlya sarkha vatata!
    Tuzya blog che ajun khoop chahate hovot hich ichchha!! Keep writing!!
    Aparna

    Like

Leave a comment