राजमा

खरंतर आपल्याकडे उसळी पोळीबरोबर खातात. पण मला स्वतःला जरा रसदार उसळी भाताबरोबर खायला आवडतात. पंजाब्यांचं राजमा-चावल हे असंच एक अप्रतिम काँबिनेशन आहे. भरपूर टोमॅटो वापरून केलेला रसदार राजमा आणि वाफाळता भात! वा! खास पंजाबी पध्दतीनं राजमा करतात तेव्हा तो बरेचदा तुपाच्या फोडणीत करतात. पंजाबी पदार्थ असल्यामुळे अर्थातच आलं-लसूण हवंच आणि थोडा खडा गरम मसालाही. मात्रContinue reading “राजमा”

दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी

मराठी जेवणात ताटात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना म्हणजेच चटणी, लोणची, कोशिंबिरींना महत्वाचं स्थान आहे. कोशिंबिरींमधून जीवनसत्वं मिळतात तर चटण्या आणि लोणची जेवणाची चव वाढवण्याबरोबरच अन्न पचनासाठी आवश्यक असलेल्या पाचक रसांच्या निर्मितीमधे मोलाचं काम बजावतात. म्हणूनच मराठी जेवण हे परिपूर्ण असतं असं म्हणतात ते उगीच नाही. माझ्या माहेरी चटण्या-लोणच्यांची रेलचेल असते. दाण्याची, तिळाची, जवसाची, कारळाची, सुक्या खोब-याचीContinue reading “दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी”

व्हेज सँडविच विथ पुदिना चटणी आणि दही डिप

        हल्ली भारतात निदान मोठ्या शहरांमधे तरी ब्रेडचे विविध प्रकार सर्रास मिळतात. सँडविच हा एक असा पदार्थ आहे की तुम्ही तो असंख्य पध्दतीनं करू शकता. म्हणजे सँडविच करताना तुम्ही ब्रेडचे वेगवेगळे प्रकार वापरू शकता, जसे की पांढरा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, वेगवेगळे हर्ब्ज घातलेला ब्रेड, वेगवेगळ्या मिश्र धान्यांचा ब्रेड, बागेत (Baguette), फोकाचिया, सारContinue reading “व्हेज सँडविच विथ पुदिना चटणी आणि दही डिप”

गोपाळकाला किंवा दहीकाला

गोकुळाष्टमीच्या दुस-या दिवशी मुंबईत अर्थातच दहीहंडीची धूम असते. बाकीच्या गावांमधेही दहीहंडी होते पण तिचं मुंबईइतकं प्रस्थ कुठेच नसतं. श्रावणात मला माझ्या मूळ गावाची बीडची खूप आठवण येते. माझी आजी गोकुळाष्टमीच्या दिवशी मोठ्या पाटावर ओल्या चिकणमातीनं गोकुळ उभं करायची. अर्थातच आम्ही तिच्या हाताखाली असायचोच. मोठ्या पाटाला आधी मातीचं कुंपण करायचं. मग त्यात वसुदेवाची कृष्णाला नदी पारContinue reading “गोपाळकाला किंवा दहीकाला”

धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी

पारशी समुदाय हा भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. मूळचे इराणी असलेले पारशी हे मुस्लिम आक्रमकतेच्या भीतीनं भारतात आले आणि ते इथलेच बनून गेले. पहिले पारशी आले ते गुजरातेतल्या उदवाड इथं. म्हणूनच पारशांची मातृभाषा गुजराती झाली. पारशी बायकांनी गुजराती साडीला आपलंसं केलं. भारतीय समाजकारण, अर्थजगत, उद्योगविश्व, मनोरंजन क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रात पारशांनी आपला अमीट ठसाContinue reading “धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी”

दाल माखनी किंवा माह की दाल

राजम्याप्रमाणेच आपण दाल माखनी किंवा माह की दाल या खास पंजाबी डाळीला अगदी आपलं म्हटलं आहे. पंजाबात थंडीमुळे असावं पण एकूणच पौष्टिक पदार्थ खाण्यावर खूप भर असतो. म्हणजे आपण ज्या डाळी किंवा कडधान्य पचायला जड असतात असं म्हणतो असे प्रथिनयुक्त पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. राजमा, माह की दाल, छोले नियमितपणे खाल्ले जातात. बरोबर अर्थातचContinue reading “दाल माखनी किंवा माह की दाल”