सब्जी तरकारी दिवस

मला आठवतं लहानपणी पानात पहिल्यांदा वाढलेलं खायचंच असा दंडक होता. कितीही नावडीची भाजी असली तरी ती खावी लागायचीच. पण खाऊन खाऊन त्या भाज्याही कधी आवडायला लागल्या ते कळलंच नाही. आज अशी एकही भाजी नाही की जी मी खात नाही. अर्थात काही भाज्या जास्त आवडतात तर काही कमी पण सगळ्या भाज्या केल्या आणि खाल्ल्या जातात.

Continue reading

Advertisements

फोडणीचं गणित

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या पुस्तकात जिवंत फोडणीचा उल्लेख आहे. त्यांच्या सास-यांना गरम वरण भातावर जिवंत फोडणी लागायची. हे वरणही वालाच्या डाळीचं असायचं. तर जिवंत फोडणी म्हणजे कढलीतून फोडणी केल्याकेल्या ती वरणावर वाढायची. तिचा चुर्र असा आवाज आला पाहिजे. मलाही अशी जिवंत फोडणी फार आवडते कारण तिच्यात ताजा खमंग वास असतो.

Continue reading

प्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक

हे तर झालं की तुम्ही स्वतः काय करून खाऊ शकता. पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहातो तेव्हा बरेचदा त्यात ब्रेकफास्टचा समावेश असतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना अनेक प्रकारची सिरीयल्स (म्युसेली, ओट्स) असतात. त्यात मध आणि फळं तसंच दूध घालून पोटभर खा. शिवाय युरोपमध्ये सुंदर ब्रेड मिळतात. त्या ब्रेडबरोबर उत्तम चीजेसही मिळतात. ती खा. फळांची तर रेलचेल असते. ती फळं खाच. पण एखादं-दुसरं फळं आपल्या हँडबॅगेत कॅरीही करा. म्हणजे ब्रेकफास्टचा प्रश्न सुटतो. गेल्या वर्षी इस्त्रायलला गेलो असताना एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी म्युसेली, योगर्ट, ताजी फळं आणि डेट हनी (खजुराचा मध) असं इतकं सुंदर मिळायचं की मी खरंतर म्युसेली फॅन नाही, पण मलाही त्याची चटक लागली होती.  

हिवाळ्यातले पदार्थ – १

मुळात भाजी मंडईत गेलं की किती भाज्या घेऊ आणि किती नको असं होतं. विशेषतः हिवाळ्यात ताज्या रसरशीत भाज्यांचे ढीग बघितले की सगळंच घ्यावंसं वाटतं. हिवाळ्यात

डाएटसाठी चालतील असे पदार्थ

मी गेल्या आठवड्यापासून थोडंसं विचारपूर्वक खायचं ठरवलं आहे. म्हणजे खरंतर मी कधीच फार बेजबाबदारपणे खात नाही. पण तरीही वाढत्या वयानुसार गेल्या वर्षभरात ५-६ किलोंची कमाई

सूपचे काही प्रकार

सध्या मी थोडंसं चांगलं खाण्याचा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतेय. मी रोज काय खाते ते मी पोस्ट करत असतेच. अनेकांनी सूपच्या रेसिपीज शेअर करायला सुचवलंय. खरं

1 2 3 4