मटार-सोलाणे-रताळी कबाब

रताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.

Continue reading

Advertisements

परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १

अन्न हेच पूर्णब्रह्मचे अनेक वाचक परदेशातले आहेत. त्यातले अनेकजण पोस्ट वाचून मेसेज करतात, त्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तसंही सांगतात. स्टिव्हन्सविल, मिशीगन इथे

अळूवडी

श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ

भेळ

चाट आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. आपल्या देशात, सर्व प्रांतांमध्ये, राज्यांमध्ये रस्त्यावर जागोजागी चाटच्या गाड्या दिसतात. चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग

हिरव्या मसाल्याचे बटाटेवडे

पावसाळा आला की चमचमीत खावंसं वाटायला लागतं. बाहेर मस्त धुवांधार पाऊस पडतोय आणि आत घराच्या ऊबेत बसून आपण गरमागरम भजी किंवा वडे खातोय, नंतर मस्त

ढोकळा

डाळीच्या पिठाचा किंवा बेसनाचा वापर मराठी जेवणात तर मुबलक प्रमाणात होतोच पण गुजराती लोकही बेसनाचा मुबलक वापर करतात. पिठलं हा मूळ गुजराती पदार्थ आहे असा

1 2