चिवळीची भाजी

चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.

Continue reading

Advertisements

अळूवडी

श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ

दिव्यांची रसमलाई

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता

उंबरांची आमटी

मराठवाड्यात ब्राह्मणसदृश जातींमध्ये पूर्वी मांसाहाराचं प्रमाण नगण्य होतं. मांसाहार हा प्रथिनांची गरज पूर्ण करणारा मोठा आणि महत्त्वाचा स्त्रोत आहे. शिवाय मराठवाड्यात वरण फक्त तुरीच्या डाळीचं

पंचामृत

  गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा (माझे आजोबा तौर म्हणायचे) वापर जेवणात करतात. कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची पद्धत

1 2 3 5