काळं मटन

गेल्या मंगळवारी माझी हिस्टरेक्टोमी झाली. मी गुरूवारी घरी आले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अंमलात आणूनच, आरामात मी मटन केलं. राणीला काहीही सांगितलं की त्याची उत्तम अंमलबजावणी करते. तसं मी तिला मसाला काढून दिला. त्यातलं काय भाजायचं, कसं भाजायचं ते सांगितलं. समोर बसून ते करून घेतलं. आणि मग शांतपणे मटन फोडणीला घातलं. त्यामुळे मलाही काही त्रास झाला नाही. आजची रेसिपी आहे काळ्या मटनाची.

Continue reading

Advertisements

चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी

तांदूळ हे जगात सर्वात जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं तृणधान्य आहे. जगभरात जिथेजिथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो अशा देशांमध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. तांदूळ उत्पादनाला

चिकन खिमा

रविवारी काहीतरी खास जेवायला करायचं ही खास मुंबई-पुण्याकडची पद्धत. जी आमच्या घरातही आहे. म्हणजे रविवारी काहीतरी मांसाहारी पदार्थ झालाच पाहिजे असं घरातल्यांना वाटतं. मग तळलेले

करंदीचं सुकं

महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मासे खाणा-यांचं प्रमाण मोठं आहे. अर्थात किनारपट्टीवरच्या सगळ्याच भागांमध्ये मासे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातातच. काही भागांत, म्हणजे उदाहरणार्थ बंगाल, ओडिशा या भागांमध्ये

कॅरॅमल पुडिंग

मुली लहान असल्यापासून आम्ही आमच्या घरात ख्रिसमस नेमानं साजरा करतो. लहान असताना त्यांना सांताक्लॉज रात्री काही तरी भेटवस्तू आपल्याला नक्की देणार असा गाढ विश्वास होता.

झटपट चिकन

माझ्या दोन्ही मुलींना मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. खरं तर म्हणूनच मी मांसाहारी पदार्थ करायला शिकले. माझ्या धाकट्या मुलीला, शर्वरीला चिकनचा तिखट रस्सा खायची लहर अधूनमधून

1 2