मटार-सोलाणे-रताळी कबाब

रताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.

Continue reading

Advertisements

हिवाळ्यातले पदार्थ – २

हिवाळातल्या पदार्थांबद्दल एक पोस्ट मी काही दिवसांपूर्वी लिहिली होती. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग. हिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्या मिळतातच. पण या हवेत त्यांची चव काही औरच

हिवाळ्यातले पदार्थ – १

मुळात भाजी मंडईत गेलं की किती भाज्या घेऊ आणि किती नको असं होतं. विशेषतः हिवाळ्यात ताज्या रसरशीत भाज्यांचे ढीग बघितले की सगळंच घ्यावंसं वाटतं. हिवाळ्यात