परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ

भारतात आपल्याला सर्रास ज्या भाज्या मिळतात त्याच भाज्या परदेशात गेलं की दुरापास्त होतात. विशेषतः अति थंडी असलेले जे देश आहेत तिथे भाज्या मिळणं अवघड होतं. प्रवास करायला गेला असाल तर काहीच दिवसांचा प्रश्न असतो तेव्हा निभावून नेता येतं. पण जर कामानिमित्त तिथे राहण्याचा प्रसंग आला तर मग पर्याय शोधणं भागच असतं. उपलब्ध असतील त्या भाज्यांमधूनचContinue reading “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ”

वाचकांचा प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी मी ब्लॉग डॉक्युमेंटेशनबद्दल एक पोस्ट लिहिली होती. अन्न हेच पूर्णब्रह्मचे वाचक कुठेकुठे आहेत ते जाणून घेण्याची इच्छा होती. त्यामुळे आपण ज्या गावात आणि देशात राहता त्या गावाचं आणि देशाचं नाव कॉमेंटमध्ये लिहा असं आवाहन मी केलं होतं. अन्न हेच पूर्णब्रह्मची प्रत्येक पोस्ट निदान ३०००० ते १००००० लोक वाचतात. पेज लाइक्स आता जवळपास २८०००Continue reading “वाचकांचा प्रतिसाद”

पंचामृत

  गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा (माझे आजोबा तौर म्हणायचे) वापर जेवणात करतात. कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची पद्धत आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र गिरीश देशमुख यांनी ही फुलं घालून केलेल्या पंचामृताची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. मी पंचामृताची रेसिपी खाली शेअर करते आहे. त्यातच ही थोडी फुलंContinue reading “पंचामृत”

आटोपशीर स्वयंपाकघर

साप्ताहिक विवेकच्या पाडवा विशेषांकात आलेला हा आटोपशीर स्वयंपाकघराबद्दलच्या लेखाची लिंक खाली शेअर करते आहे. http://evivek.com/Encyc/2016/4/2/kichan.aspx#.VxoW1fl97IV सायली राजाध्यक्ष  

मेथीफळं

शहरी राहणीमानामुळे म्हणा किंवा मुलांच्या बदललेल्या आवडीनिवडींमुळे म्हणा पण आजकाल बरेचसे पारंपरिक पदार्थ घराघरांमधून हद्दपार झालेले आहेत. आमच्याकडे निरंजन सारस्वत तर मी देशस्थ. सारस्वतांचे फणसाचा तळ, धोंडस, तिरफळं घालून केलेली माशांची वा डाळीची आमटी हे पदार्थ निरंजनला आवडत नाहीत त्यामुळे ते आमच्या घरात केले जात नाहीत. माझ्या सासुबाई मात्र अजूनही क्वचित का होईना पण हेContinue reading “मेथीफळं”

सोलापुरी मसाल्यातली चवळीची उसळ

अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण सुपर्णा राखे-भोसले हिनं मला मध्यंतरी एक मेसेज पाठवला होता. तिला हे पेज खूप आवडतं आणि या पेजमुळे तिला खूप मदत होते असं तिनं या मेसेजमध्ये कळवलं होतं. सुपर्णा ही मूळची सोलापूरची. लग्न होऊन ती मुंबईत आली. ती एका खाजगी बँकेत टेक्नॉलॉजी विभागात काम करते. लग्नापूर्वी तिला स्वयंपाक करायला आवडायचं पणContinue reading “सोलापुरी मसाल्यातली चवळीची उसळ”

सोडाबॉटलओपनरवाला

पारसी आणि इराणी या दोन्ही जमाती इराणमधून भारतात येऊन स्थायिक झाल्या. पारसी आणि इराणी या दोन्ही जमाती मूळच्या इराणच्याच. दोन्ही जमाती झरातृष्ट किंवा झोरास्टरलाच पुजतात. दोन्ही जमातींचा धर्म झोराष्ट्रीयनच. पण तरीही दोन्ही जमाती वेगवेगळ्या. खाण्यापिण्याच्या सवयीही काहीशा वेगळ्या. पारसी हे इराण्यांच्या फार आधी भारतात आले. इस्लामी राज्यकर्त्यांनी इराणवर आक्रमण केल्यानंतर आपली कत्तल होईल या भीतीनंContinue reading “सोडाबॉटलओपनरवाला”

मसाला मसाला!

भारतीय जेवण इतकं चवदार असतं कारण आपल्या जेवणांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर असतो. भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये मसाल्यांचा मुबलक वापर केला जातो. मग त्या मसाल्यांचं स्वरूप वेगळं असेल किंवा घटक पदार्थही वेगळे असतील, पण मसाले वापरले जातात इतकं नक्की. प्रांतागणिक मसाल्यांमधले घटक पदार्थ बदलतात. त्यातही सुके मसाले आणि ताजे ओले मसाले असं वर्गीकरण असतंच. सुके मसाले किंवाContinue reading “मसाला मसाला!”

खानदेशी मिरच्यांची भाजी

जळगाव, धुळे, अमळनेर, नंदुरबार हा सगळा भाग म्हणजे खानदेश. इथली खाद्यसंस्कृती इतकी मस्त झणझणीत आहे की बस्स! कदाचित म्हणूनच या प्रदेशाचं नाव खानदेश तर पडलं नसेल ना?!! या भागातलं डायरेक्ट विस्तवावर भाजलेल्या वांग्याचं भरीत, माठात केली जाणारी तूप-लसूण-मिरची-दगडफूल वापरून केली जाणार कढी, शेवेची मटन मसाला वापरून केली जाणारी, नाक-तोंडातून पाणी काढणारी भाजी असे अस्सल पदार्थContinue reading “खानदेशी मिरच्यांची भाजी”

भारतीय लोणचं दिवस

गेली काही वर्षं प्रत्येक गोष्टीचा एखादा खास दिवस ठरवण्याची पद्धत रूळते आहे. आणि ही पद्धत मला आवडते. निदान त्यामुळे त्या विषयावर किती तरी चर्चा होते. म्हणजे २१ डिसेंबर हा वर्ल्ड साडी डे आहे किंवा १ डिसेंबर हा इंटरनॅशनल एड्स डे आहे तर २९ सप्टेंबर हा इंटरनॅशनल हार्ट डे आहे. १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहाContinue reading “भारतीय लोणचं दिवस”