भरली भेंडी

भेंडीची भाजी आवडत नाही असं लहान मूल बहुधा नसतंच. मुलांना नुसती परतलेली साधी भेंडीची भाजी जास्त आवडते. भरलेली भेंडी, चिंचगुळातली भेंडी, ताकातली भेंडी, तळलेली राजस्थानी भेंडी असे भेंडीच्या भाजीचे किती तरी प्रकार होत असतात. काही लोक उपासालाही भेंडीची भाजी खातात. उपासाला खाल्ले जाणारे बहुतेक सगळे पदार्थ जसे मूळचे परदेशी आहेत तसंच भेंडीचंही आहे. भेंडी मूळचीContinue reading “भरली भेंडी”

बिसी बेळे भात

भातांचे प्रकार म्हणजे अहाहा! खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातलाContinue reading “बिसी बेळे भात”

धाबेवाली डाळ

आपल्याकडे महाराष्ट्रात, विशेषतः मराठी घरांमध्ये वरण किंवा आमटी पातळ करण्याची पद्धत आहे. कालवण आपल्याला पातळच लागतं. त्यामुळे खरंतर आपण आमट्यांमधून फारसं प्रोटीन खात नाही. पण जसंजसं आपण वर उत्तरेकडे जायला लागतो तसंतसंआमटी घट्ट व्हायला लागते. विशेषतः पंजाबात तर आमट्यांना आमटी न म्हणता डाळी म्हणतात ते अगदी बरोबर आहे कारण तिथे डाळी अगदी दाट असतात. तिथल्याContinue reading “धाबेवाली डाळ”

बर्मा बर्मा – रेस्टॉरंट रिव्ह्यू

ब्रह्मदेश किंवा म्यानमार हा आपल्यासाठी कायम एक गूढ राहिलेलं आहे. मेरे पिया गये रंगून, वहा से किया है टैलिफून या गाण्यामधूनच ब्रह्मदेशचा आणि आपला काय तो संबंध. आणि हो टिळकांना झालेला मंडालेचा तुरूंगवासही आहेच. खुदिराम बोसच्या बाँबहल्ल्याचं केसरीतून समर्थन केल्याबद्दल टिळकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला. या खटल्यात त्यांना सहा वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला. त्यासाठीContinue reading “बर्मा बर्मा – रेस्टॉरंट रिव्ह्यू”

भरलेले कांदे

कांद्याशिवाय भारतीय स्वयंपाकाचा आपण विचारही करू शकत नाही. आपल्याकडे जवळपास ७०-८० टक्के भाज्यांमध्ये फोडणीला कांदा घातला जातो. शिवाय कालवणं, मांसाहारी पदार्थ यांनाही कांदा हवाच. कांद्याची पीठ पेरून भाजी, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचं रायतं असे किती तरी पदार्थ रोजच्या जेवणात आपण करत असतो. कांदा-मिरची घातलेलं चमचमीत ऑम्लेट काय मस्त लागतं! कच्चा कांदा नसेल तर भेळ, पाव-भाजी, रगडाContinue reading “भरलेले कांदे”

मटार पॅटिस

हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच. हल्लीContinue reading “मटार पॅटिस”

तेलवांगं

तेलवांगं हा प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला तो माझ्या मित्राच्या घरी. तोपर्यंत मी या पदार्थाबद्दल फक्त ऐकलं होतं. माझ्या मित्राची गिरीशची बायको दीपा ही कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिचा स्वयंपाक चमचमीत आणि झणझणीत असतो. खास कोल्हापुरी मसाला घालून केलेलं पिठलं तर ती इतकं अप्रतिम बनवते की फक्त बोटं चाटत राहावं. मी एकदा त्यांच्या घरी राहायला गेले होतेContinue reading “तेलवांगं”

तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी

आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात.Continue reading “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी”

भोगीचं जेवण

तर आजची ही पहिली पोस्ट आहे धुंदुरमासाच्या जेवणाची. म्हणजेच भोगीला केल्या जाणा-या स्वयंपाकाची. ही पोस्ट गेल्या वर्षीचीच आहे. नवीन लोकांसाठी परत पोस्ट करते आहे. गेल्या वर्षी भोगीच्या भाजीचे फोटो काढलेले नव्हते ते आज मुद्दाम काढून शेअर करते आहे. आज धुंदुरमासाचा शेवटचा दिवस, भोगी. महाराष्ट्रात भोगीला खास जेवण केलं जातं. याला धुंदुरमासाचं जेवण असंही म्हणतात. हेContinue reading “भोगीचं जेवण”

भाजी बाजार…

हिवाळा आला की मी बीडची, पर्यायानं माझ्या आजी-आजोबांची फार आठवण येते. मला माहीत आहे की माझ्या पोस्ट्समध्ये बीडचा वारंवार उल्लेख येतो, तो काहींना खटकतही असेल. पण असं होतं खरं. म्हणतात ना की आपण आपल्या जगण्यातला सगळ्यात सुंदर काळ जिथे घालवतो त्या आठवणीच आपल्या मनात कायम राहतात. तसं होत असावं कदाचित. बीड सोडून इतकी वर्षं झालीContinue reading “भाजी बाजार…”