कुकर मेथड

एकदा माझ्या कुकर मेथडबद्दल लिहीन असं मागे एकदा मी म्हटलं होतं. परतलेल्या भाज्या सोडल्या तर रोजचा बहुतेक सर्व स्वयंपाक मी कुकरमध्ये करते. कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचे किती तरी फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कुकरमध्ये पदार्थ केल्यानं त्यातली पोषणमूल्यं ब-यापैकी शाबूत राहतात. उघड्या कढयांमध्ये किंवा भांड्यांमध्ये पदार्थ शिजवतो तेव्हा त्यातल्या पोषणमूल्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत असतो.Continue reading “कुकर मेथड”