चिंचगुळाची आमटी

भारतीय जेवणात डाळीला फार महत्व आहे. कदाचित असंही असेल की आपल्या देशात तुलनेनं शाकाहारी लोकांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण जेवणात डाळींचा वापर जास्त करत असू. भारतातल्या जवळपास सर्व प्रांतांमधे जेवणात डाळीचा आमटीसदृश पदार्थ असतोच असतो. शिवाय आपल्याकडे भाज्यांमधे भिजवलेल्या डाळी घालतात. किंवा पीठ पेरून भाज्या केल्या जातात त्याही बहुतेकदा डाळींची पिठंContinue reading “चिंचगुळाची आमटी”