मराठी जेवणात, मुख्यतः कोकण वगळता इतर भागांतल्या जेवणात ताटातल्या डाव्या बाजुला खूप महत्व दिलं जातं. मराठवाडा आणि विदर्भात तर चटण्या-लोणच्यांसारख्या तोंडी लावण्यांची रेलचेल असते. आता जसा उन्हाळा तापायला लागलाय तसं नेहमीचं जेवण नकोसं वाटायला लागतं. विशेषतः मसालेदार भाज्या-आमट्या नकोशा होतात. तोंडाला चव आणणारं काहीतरी चटकमटक खावंसं वाटतं. मला तर या दिवसांमध्ये आमरस आणि पोळीशिवाय काहीचContinue reading “कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी”