धाबेवाली डाळ

आपल्याकडे महाराष्ट्रात, विशेषतः मराठी घरांमध्ये वरण किंवा आमटी पातळ करण्याची पद्धत आहे. कालवण आपल्याला पातळच लागतं. त्यामुळे खरंतर आपण आमट्यांमधून फारसं प्रोटीन खात नाही. पण जसंजसं आपण वर उत्तरेकडे जायला लागतो तसंतसंआमटी घट्ट व्हायला लागते. विशेषतः पंजाबात तर आमट्यांना आमटी न म्हणता डाळी म्हणतात ते अगदी बरोबर आहे कारण तिथे डाळी अगदी दाट असतात. तिथल्याContinue reading “धाबेवाली डाळ”

पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा

अचानक झटपट एखादं काही तरी वेगळं करायचं मनात येतं. आणि मग ते मनासारखं जमलं की मस्त वाटतं. परवा असंच झालं. घरातल्या भाज्या संपल्या होत्या. म्हणून रात्री छोले भिजत घातले होते. सकाळच्या जेवणाला छोले करू या असं ठरवलं. पण रात्रीचा प्रश्न होताच. भरपूर पुदिना घरात होता. म्हणून ठरवलं चटणी वाटून सँडविचेस करू या. तशी पुदिना, कोथिंबीर,Continue reading “पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा”

सरसों का साग आणि मकई की रोटी

जिंदगी जब भी तेरी बज्म मे लाती है हमे हे उमराव जानमधलं गाणं ऐकायला जितकं तलम आहे तितकंच ते बघायलाही नेत्रसुखद आहे. पिवळ्याधमक फुलांनी फुललेल्या मोहरीच्या शेतांमध्ये देखण्या रेखाला आणि गोड फारूख शेखला बघणं किती आनंददायी आहे. हे गाणं असो किंवा तुझे देखा तो ये जाना सनमसारखी पंजाबातल्या सरसोंच्या शेतात चित्रीत झालेली इतर गाणी असोतContinue reading “सरसों का साग आणि मकई की रोटी”

पालक पनीर

माझ्या धाकट्या मुलीला शर्वरीला हिरव्या रंगाच्या भाज्या पाहिल्या की कसं तरी होतं म्हणे! फक्त भेंडी आणि तोंडली या दोनच हिरव्या भाज्या तिला आवडतात. आणि अर्थातच ताजे मटार. या मोसमात ती अक्षरशः किलोभर मटार रोज खाते. आता ती अकरावीत आहे. पण गेल्या वर्षीपर्यंत या मोसमात ती शाळेतून आल्याबरोबर डायनिंग टेबलवर ताजे मटार ठेवलेले आहेत की नाहीContinue reading “पालक पनीर”

राजमा

खरंतर आपल्याकडे उसळी पोळीबरोबर खातात. पण मला स्वतःला जरा रसदार उसळी भाताबरोबर खायला आवडतात. पंजाब्यांचं राजमा-चावल हे असंच एक अप्रतिम काँबिनेशन आहे. भरपूर टोमॅटो वापरून केलेला रसदार राजमा आणि वाफाळता भात! वा! खास पंजाबी पध्दतीनं राजमा करतात तेव्हा तो बरेचदा तुपाच्या फोडणीत करतात. पंजाबी पदार्थ असल्यामुळे अर्थातच आलं-लसूण हवंच आणि थोडा खडा गरम मसालाही. मात्रContinue reading “राजमा”