दिव्यांची रसमलाई

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”

प्रसादाचे दहा पदार्थ

गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. या दिवसात घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात.Continue reading “प्रसादाचे दहा पदार्थ”

रव्याचे मऊ लाडू

काल आम्हा फेसबुक मित्रमैत्रिणींचं एक गेटटुगेदर मुंबईत झालं. एकूण २६-२७ लोक होते. त्यातल्या फक्त दोघांना मी याआधी प्रत्यक्ष भेटले होते. एक माझा कॉलेजमधला मित्र अतुल खेरडे आणि मी दूरदर्शनला काम करत असतानाची सहकारी सोनाली जोशी असे दोन जण सोडले तर बाकी सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटले. पण खरं सांगते मला फार मजा आली. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामContinue reading “रव्याचे मऊ लाडू”

कणकेचा शिरा

मला स्वतःला फारसं गोड खायला आवडत नाही. त्यामुळेच असेल पण मला फारसे गोड पदार्थ चांगले करता येत नाहीत. पण आता माझ्या रेसिपी पेजच्या निमित्तानं मीही नवीन गोड पदार्थ करून बघतेय. माझ्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. शेवटच्या दिवशी प्रसादासाठी मी कणकेचा शिरा केला होता. मला जे हातावर मोजता येतील असे गोड पदार्थ आवडतात त्यात कणकेचा शिराहीContinue reading “कणकेचा शिरा”

तळलेले मोदक

आज गणेश चतुर्थी, आज घरोघरी गोड पदार्थ म्हणून अर्थातच मोदक केले जातात. कोकणात तसंच पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी उकडीचे मोदक केले जातात तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागांमधे बहुतेक लोक तळलेले मोदक करतात. आता जरी नारळ सगळीकडे सर्रास मिळत असले तरी ज्या ज्या भागात नारळ पिकत नाहीत त्या भागांमधे पूर्वीपासून सुक्या सारणाचे, म्हणजे सुकं खोबरंContinue reading “तळलेले मोदक”