श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारणContinue reading “अळूवडी”
Tag Archives: पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती
दिव्यांची रसमलाई
आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”
कढीपत्त्याची चटणी
भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. सांबार, दहीबुत्ती, रस्सम, बघारे बैंगन, मिरची का सालन अशा सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कढीपत्त्याची फोडणी हवीच हवी. आपल्याकडेही ब-याचशा भाज्या, आमट्या, कोशिंबिरींच्या फोडणीत कढीपत्ता वापरला जातोच. कढीपत्त्याच्या फोडणीशिवाय चिवडा कसा ओकाबोका दिसतो! फोडणीचा भात, बटाट्याची पिवळी सुकी भाजी, मुगा गाठी या पदार्थांचं रूप कढीपत्त्याच्या खमंग फोडणीमुळेचContinue reading “कढीपत्त्याची चटणी”
धपाटे
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरीContinue reading “धपाटे”
रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ
पाश्चात्य जगातला वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही सर्रास रूढ होतो आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जिथे लोक रोज खूप प्रवास करून रात्री उशीरा घरी पोहोचतात तिथे तरी. उशीरा घरी परतल्यावर नव्यानं साग्रसंगीत स्वयंपाक करण्याची ऊर्जा अंगात उरलेली नसते. स्वयंपाकाला एखाद्या मावशी किंवा महाराज असेल तर ठीक किंवा घरी आई किंवा सासू असेल तर उत्तमच.Continue reading “रात्रीच्या जेवणासाठी काही साधे-सोपे पदार्थ”
ओल्या काजुची उसळ
ओल्या काजुची उसळ किंवा आमटी ही खास कोकणातली खासियत. मी मराठवाड्यातली असल्यामुळे मी ओले काजू पहिल्यांदा बघितले ते लग्नानंतर मुंबईत आल्यावर. मुळात मला सगळ्या सुक्यामेव्यात काजू सर्वात जास्त आवडतात. लग्न ठरल्यावर माझी आई आणि मी मुंबईला आलो होतो तेव्हा आमच्याच कॉलनीतल्या गाडगीळ मावशींनी आम्हा दोघींना जेवायला बोलावलं होतं. तेव्हा गंगाधर गाडगीळ काका अगदी चालतेफिरते होते.Continue reading “ओल्या काजुची उसळ”
बाजरीचा खिचडा
आपल्याकडे बाजरी फक्त हिवाळ्यात खाल्ली जाते. बाजरी उष्ण असते असा एक समज प्रचलित आहे. खरं तर बाजरीमध्ये उच्च पोषणमूल्यं असतात. बाजरीत कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे बाजरीचा जेवणात नियमित वापर व्हायला हवा. बाजरीला इंग्रजीत पर्ल मिलेट असं सुंदर नाव आहे. बाजरी दिसतेही मोत्यांसारखीच. मूळ आफ्रिकन असलेली बाजरी फार पूर्वी आपल्याकडे पिकवायला लागलेContinue reading “बाजरीचा खिचडा”
कर्नाटकी मुद्दा भाजी
शेजारी शेजारी असलेल्या प्रांतांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी, पदार्थांच्या पाककृती थोड्या-फार प्रमाणात सारख्या असतात. थोड्या-फार यासाठी म्हणते आहे की, पुढच्या प्रांतात त्या काहीशा बदलतात. म्हणजे केरळमधून तामिळनाडूत गेलं की सांबार आहेच पण त्या सांबाराची पध्दत वेगळी. मल्याळी सांबार हे खूप घट्ट असतं. तामिळनाडूत हेच सांबार जरासं पातळ होतं पण या सांबारात गूळ नाही. पुढे कर्नाटकात सांबार आहेचContinue reading “कर्नाटकी मुद्दा भाजी”
भरली वांगी
मसाला भरून भाज्या किंवा मांसाहारी पदार्थ करण्याची पध्दत जगभर प्रचलित आहे. स्टफ्ड मश्रूम्स, स्टफ्ड पटेटोज विथ चीज, स्टफ्ड कॅप्सिकम असेल किंवा टर्किश रेसिपी डोल्मा (Dolma) असेल या सगळ्या भरून केल्या जाणा-या पाककृती आहेत. भारतातही बहुतांश सगळ्या प्रांतांमध्ये भरून भाज्या करण्याची पध्दत आहेच. आपल्याकडेही भरली कारली, भरली भेंडी, भरलं पडवळ, भरली वांगी केली जातातच. हैदराबादला म्हणजेContinue reading “भरली वांगी”
कांदा-टोमॅटो-बटाट्याचा साधा रस्सा
बटाटा ही भाजी बहुतेक सगळ्यांना आवडते. बटाट्याच्या साध्या काच-या असोत, बटाटे उकडून केलेली साधी, कोथिंबीर-कढीपत्ता घातलेली भाजी असो, बटाट्याची उपासाची भाजी असो, कांदा-खोब-याचं वाटण लावलेला रस्सा असो किंवा कांदा घालून केलेली जास्त तेलातली चमचमीत भाजी असो, बटाट्याची किती तरी पध्दतीनं भाजी करता येते. अर्थात बटाटा ही खरंतर तशी भाजी नव्हेच. बटाटा हा मुख्यत्वे पिष्टमय पदार्थ.Continue reading “कांदा-टोमॅटो-बटाट्याचा साधा रस्सा”