चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.
Tag Archives: मराठीपदार्थ
आंबट बटाटा
बटाटा ही जगातली सर्वाधिक लोकांची लाडकी भाजी. खरंतर ही भाजी नव्हे तर कंदमूळ आहे. पण आपल्याकडे बटाट्याची भाजी लोकप्रिय असल्यानं आपण त्याला भाजी म्हणतो. बटाटा मूळचा दक्षिण अमेरिकेतला. स्पॅनिश लोकांनी त्याचा जगभरात प्रसार केला. त्यानंतर बटाटा जगभरात इतका लोकप्रिय झाला की आज बहुसंख्य देशांच्या स्वयंपाकात बटाट्याला फार मानाचं स्थान आहे. तुम्ही बघितलंत तर युरोपात तसंचContinue reading “आंबट बटाटा”