दिव्यांची रसमलाई

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-याContinue reading “दिव्यांची रसमलाई”

कणकेचा शिरा

मला स्वतःला फारसं गोड खायला आवडत नाही. त्यामुळेच असेल पण मला फारसे गोड पदार्थ चांगले करता येत नाहीत. पण आता माझ्या रेसिपी पेजच्या निमित्तानं मीही नवीन गोड पदार्थ करून बघतेय. माझ्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. शेवटच्या दिवशी प्रसादासाठी मी कणकेचा शिरा केला होता. मला जे हातावर मोजता येतील असे गोड पदार्थ आवडतात त्यात कणकेचा शिराहीContinue reading “कणकेचा शिरा”

उकडीचे मोदक

तळलेल्या मोदकांची रेसिपी शेअर केल्यावर ब-याच जणांनी उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर करायची विनंती केली. आता खरी गोष्ट अशी की, मी स्वतः कधीच उकडीचे मोदक केले नव्हते. पण मग या निमित्तानं मीही उकडीचे मोदक करून बघायचे ठरवलं. तसे मी आज ते केले. अजून खाल्ले नाहीत, पण बरे झाले असावेत! माझ्या घरी मला मदत करणारी माझी मदतनीसContinue reading “उकडीचे मोदक”

तळलेले मोदक

आज गणेश चतुर्थी, आज घरोघरी गोड पदार्थ म्हणून अर्थातच मोदक केले जातात. कोकणात तसंच पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी उकडीचे मोदक केले जातात तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागांमधे बहुतेक लोक तळलेले मोदक करतात. आता जरी नारळ सगळीकडे सर्रास मिळत असले तरी ज्या ज्या भागात नारळ पिकत नाहीत त्या भागांमधे पूर्वीपासून सुक्या सारणाचे, म्हणजे सुकं खोबरंContinue reading “तळलेले मोदक”

लाल भोपळ्याचे घारगे

श्रावणात शाकाहारी पदार्थांवर भर असतो. त्यातही श्रावणापासून पुढे दिवाळीपर्यंत सतत सण सुरू असतात. आता आपण काही सणांची कर्मकांडं करत नसलो तरी घरात त्यानिमित्तानं गोडधोड होतच असतं. परत त्या त्या सणाला त्या त्या सणाचे पारंपरिक पदार्थ करण्यावर माझा भर असतो कारण त्यामुळेच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपली जाते असं मला वाटतं. माझी मैत्रीण विद्या स्वामिनाथन हिनं लाल भोपळ्यांच्याContinue reading “लाल भोपळ्याचे घारगे”

पुरणाचे दिंड

नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण. श्रावण सुरू झाला की आजी कहाण्यांच्या पुस्तकातल्या कहाण्या रोज वाचायला लावायची. शुक्रवारची कहाणी, रविवारी आदित्य राणुबाईची कहाणी, जिवतीची कहाणी अशा सगळ्या कहाण्या मी वाचायचे आणि ते ऐकत आजी पूजा करायची. एक आटपाट नगर होतं अशी त्या प्रत्येक कहाणीची सुरूवात असायची. आता आपण काहीच मानत नाही, पण माझी आजी सगळं मानायची.Continue reading “पुरणाचे दिंड”

नारळी भात

श्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतातContinue reading “नारळी भात”