काळं मटन

गेल्या मंगळवारी माझी हिस्टरेक्टोमी झाली. मी गुरूवारी घरी आले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अंमलात आणूनच, आरामात मी मटन केलं. राणीला काहीही सांगितलं की त्याची उत्तम अंमलबजावणी करते. तसं मी तिला मसाला काढून दिला. त्यातलं काय भाजायचं, कसं भाजायचं ते सांगितलं. समोर बसून ते करून घेतलं. आणि मग शांतपणे मटन फोडणीला घातलं. त्यामुळे मलाही काही त्रास झाला नाही. आजची रेसिपी आहे काळ्या मटनाची.

चिवळीची भाजी

चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.

मटार-सोलाणे-रताळी कबाब

रताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.

हिवाळ्यातले पदार्थ – १

मुळात भाजी मंडईत गेलं की किती भाज्या घेऊ आणि किती नको असं होतं. विशेषतः हिवाळ्यात ताज्या रसरशीत भाज्यांचे ढीग बघितले की सगळंच घ्यावंसं वाटतं. हिवाळ्यात बहुतेक भाज्या मिळतात आणि त्याही ताज्या. नुकताच पाऊस होऊन गेलेला असतो त्यामुळे त्या पाण्याचा अंश जमिनीत असतो आणि पावसाळ्यात अति पाण्यानं भाज्या सडतात तसंही होत नाही. हिवाळ्यात मिळणा-या भाज्यांचं कायContinue reading “हिवाळ्यातले पदार्थ – १”