आटोपशीर स्वयंपाकघर

साप्ताहिक विवेकच्या पाडवा विशेषांकात आलेला हा आटोपशीर स्वयंपाकघराबद्दलच्या लेखाची लिंक खाली शेअर करते आहे. http://evivek.com/Encyc/2016/4/2/kichan.aspx#.VxoW1fl97IV सायली राजाध्यक्ष  

तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी

आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची. हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात.Continue reading “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी”

भोगीचं जेवण

तर आजची ही पहिली पोस्ट आहे धुंदुरमासाच्या जेवणाची. म्हणजेच भोगीला केल्या जाणा-या स्वयंपाकाची. ही पोस्ट गेल्या वर्षीचीच आहे. नवीन लोकांसाठी परत पोस्ट करते आहे. गेल्या वर्षी भोगीच्या भाजीचे फोटो काढलेले नव्हते ते आज मुद्दाम काढून शेअर करते आहे. आज धुंदुरमासाचा शेवटचा दिवस, भोगी. महाराष्ट्रात भोगीला खास जेवण केलं जातं. याला धुंदुरमासाचं जेवण असंही म्हणतात. हेContinue reading “भोगीचं जेवण”

भाजी बाजार…

हिवाळा आला की मी बीडची, पर्यायानं माझ्या आजी-आजोबांची फार आठवण येते. मला माहीत आहे की माझ्या पोस्ट्समध्ये बीडचा वारंवार उल्लेख येतो, तो काहींना खटकतही असेल. पण असं होतं खरं. म्हणतात ना की आपण आपल्या जगण्यातला सगळ्यात सुंदर काळ जिथे घालवतो त्या आठवणीच आपल्या मनात कायम राहतात. तसं होत असावं कदाचित. बीड सोडून इतकी वर्षं झालीContinue reading “भाजी बाजार…”

धपाटे

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरीContinue reading “धपाटे”

नववर्षाचं स्वागत

हा हुरड्याचा मोसम आहे. हुरडा म्हणजे ओली, कोवळी ज्वारी हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात गावोगावी या दिवसात हुरडा पार्ट्या होतात. ताजा भाजलेला हुरडा, बरोबर दाण्याची, लसणाची, तिळाची झणझणीत तिखट चटणी, हुरड्याच्या ताटानं खायला दही-साखर, बरोबर बोरं, टहाळा (ओला हरभरा), उसाच्या गंडे-या. शिवाय डाळ-बाटीचं किंवा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, खिचडी असं जेवण. पण हे सगळंContinue reading “नववर्षाचं स्वागत”

प्रसादाचे दहा पदार्थ

गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. या दिवसात घरोघरी सकाळ-संध्याकाळ आरतीचे आवाज ऐकू येतात.Continue reading “प्रसादाचे दहा पदार्थ”

भाताचे प्रकार – २

गेल्या पोस्टमध्ये मी भातांच्या नेहमी केल्या जाणा-या प्रकारांबद्दल लिहिलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण भाताचे कितीतरी प्रकार करू शकतो. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग. कॉर्न पुलाव – १ वाटी तांदूळ असतील तर १ वाटी कॉर्न दाणे, १ वाटी गाजराचा कीस आणि अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची घ्या. तूपावर थोडा अख्खा गरम मसाला (२ लवंगा,Continue reading “भाताचे प्रकार – २”

भाताचे प्रकार -१

भात हा आपल्या देशातल्या लोकांच्या जेवणातला एक अनिवार्य पदार्थ आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये या ना त्या स्वरूपात भात खाल्ला जातो. शिवाय आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. किनारपट्टीवरच्या लोकांचं भात आणि मासे हे ठरलेलं जेवण असतंच. आपल्याकडे तांदूळ वापरून केले जाणारे इडली, डोसा, उत्तप्पा, पापड हे पदार्थ तसंच तांदळाचं पीठContinue reading “भाताचे प्रकार -१”

कांद्याचे पदार्थ

काल एपिक या चॅनलवर ‘लॉस्ट रेसिपीज’ या कार्यक्रमात अनोखी खीर हा पदार्थ बघितला. ही खीर खरोखरच अनोखी होती कारण ही खीर कांद्याची होती! कांद्याची खीर करतात हे तर मी पहिल्यांदाच बघितलं. कांदा आणि गोड पदार्थ ही कल्पनाच कशीशीच वाटते. आपल्याकडे कांदा गुळाच्या पाकात घालून एक पदार्थ केला जातो. पण गोड पदार्थात सर्रास कांदा वापरला जातContinue reading “कांद्याचे पदार्थ”