रूपं पूर्णब्रह्माची

‘माहेर’ मासिकाच्या या वर्षीच्या वर्षारंभ अंकात मी ‘रूपं पूर्णब्रह्माची’ नावाचा लेख लिहिला होता. तो लेख आज मी तुम्हा सर्वांसाठी शेअर करतेय. पाचवी-सहावीत असेन तेव्हाची ही आठवण आहे. आम्ही तेव्हा बीडला राहात होतो. माझी आजी कॉफी घ्यायची. ती शाळेत असताना गांधीजींनी प्रत्येकाला स्वतःच्या एका आवडत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला म्हणून तिनं तिला अतिशय प्रिय असलेला चहाContinue reading “रूपं पूर्णब्रह्माची”

चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी

तांदूळ हे जगात सर्वात जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं तृणधान्य आहे. जगभरात जिथेजिथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो अशा देशांमध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. तांदूळ उत्पादनाला फारसे कष्ट लागत नाहीत. जगात सगळ्यात जास्त तांदूळ चीनमध्ये आणि त्या खालोखाल भारतात पिकवला जातो. साहजिकच भारतीय जेवणात भाताच्या प्रकारांना अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी दक्षिणेपासून बघितलं तर तैरसादम (दही भात),Continue reading “चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी”

शीरखुर्मा

मी लहानपणी ज्या गावात वाढले ते बीड आणि नंतरच्या काळात जिथे राहिले ते औरंगाबाद ही दोन्ही गावं निजामशाहीतली. त्यामुळे या दोन्ही गावांवर मुस्लिम संस्कृतीचा मोठा पगडा आहे. कारण एक तर मोठ्या प्रमाणावर मुसलमान लोकसंख्या आहेच. शिवाय हैदराबाद संस्थानात असल्यामुळे भाषा, चालीरितींवरही मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आहे. माझ्या औरंगाबादच्या मित्रमंडळीशी मी हिंदीत बोलते याचं माझ्या मुलींना नवलContinue reading “शीरखुर्मा”

एक आगळंवेगळं पुस्तक

परवा बाबांनी फोनवर एका नवीन पुस्तकाचा उल्लेख केला आणि तुला ते पाठवतो म्हणाले. काल श्रीकांत उमरीकरनं ते पुस्तक पाठवलंसुद्धा. आणि माझं आज ते बहुतेक वाचून संपलंसुद्धा. अन्न हेच अपूर्णब्रह्म या नावाचं शाहू पाटोळे यांचं हे पुस्तक आहे. बाबांना ते बघून वाटलं की खूप वेगळं पुस्तक आहे आणि मला ते आवडेल आणि तसंच झालं. अगदी वेगळंContinue reading “एक आगळंवेगळं पुस्तक”

फ्रुट सॅलड किंवा फ्रुट कस्टर्ड

पावसाळा आहे की उन्हाळाच सुरू आहे असं वाटावं इतकी पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे ऊनही कडकडीत पडतंय, उकाडाही असह्य आहे. उन्हाळ्यात जसं दुपारी थंडगार पन्हं किंवा सरबत घ्यावंसं वाटतं किंवा सतत आईस्क्रीम खावंसं वाटतं तसंच आताही वाटतंय. एक खास उन्हाळ्यात केल्या जाणा-या पदार्थाची रेसिपी शेअर करायची राहिली होती. म्हणजे ती कधीही करता येते पण उन्हाळ्यातContinue reading “फ्रुट सॅलड किंवा फ्रुट कस्टर्ड”

पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा

अचानक झटपट एखादं काही तरी वेगळं करायचं मनात येतं. आणि मग ते मनासारखं जमलं की मस्त वाटतं. परवा असंच झालं. घरातल्या भाज्या संपल्या होत्या. म्हणून रात्री छोले भिजत घातले होते. सकाळच्या जेवणाला छोले करू या असं ठरवलं. पण रात्रीचा प्रश्न होताच. भरपूर पुदिना घरात होता. म्हणून ठरवलं चटणी वाटून सँडविचेस करू या. तशी पुदिना, कोथिंबीर,Continue reading “पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा”

कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी

मराठी जेवणात, मुख्यतः कोकण वगळता इतर भागांतल्या जेवणात ताटातल्या डाव्या बाजुला खूप महत्व दिलं जातं. मराठवाडा आणि विदर्भात तर चटण्या-लोणच्यांसारख्या तोंडी लावण्यांची रेलचेल असते. आता जसा उन्हाळा तापायला लागलाय तसं नेहमीचं जेवण नकोसं वाटायला लागतं. विशेषतः मसालेदार भाज्या-आमट्या नकोशा होतात. तोंडाला चव आणणारं काहीतरी चटकमटक खावंसं वाटतं. मला तर या दिवसांमध्ये आमरस आणि पोळीशिवाय काहीचContinue reading “कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी”

ओल्या काजुची उसळ

ओल्या काजुची उसळ किंवा आमटी ही खास कोकणातली खासियत. मी मराठवाड्यातली असल्यामुळे मी ओले काजू पहिल्यांदा बघितले ते लग्नानंतर मुंबईत आल्यावर. मुळात मला सगळ्या सुक्यामेव्यात काजू सर्वात जास्त आवडतात. लग्न ठरल्यावर माझी आई आणि मी मुंबईला आलो होतो तेव्हा आमच्याच कॉलनीतल्या गाडगीळ मावशींनी आम्हा दोघींना जेवायला बोलावलं होतं. तेव्हा गंगाधर गाडगीळ काका अगदी चालतेफिरते होते.Continue reading “ओल्या काजुची उसळ”

कैरीचं पारंपरिक पन्हं आणि पुदिना पन्हं

बेमोसमी पाऊस मधूनच हूल देत असला तरी उन्हाळा चांगलाच तापलाय हेही खरं. त्यामुळे आता दुपारच्या चहाऐवजी त्यावेळेला गारेगार कलिंगड (टरबूज) चिरून खावंसं किंवा लिंबू सरबत किंवा कैरीचं पन्हं घ्यावंसं वाटायला लागलंय. मी लहान असताना जेव्हा बीडला राहात होते तेव्हा आमच्याकडे मागच्या अंगणात आंघोळीचं पाणी तापवायला एक चूल होती. सकाळी आंघोळी आटोपल्या की आजी त्या चुलीच्याContinue reading “कैरीचं पारंपरिक पन्हं आणि पुदिना पन्हं”

लहान मुलांसाठीचे सोपे पदार्थ भाग २

लहानग्यांना खायला काय द्यायचं हा प्रश्न आयांसमोर सतत असतो. लहानग्यांसाठी काही सोपे पदार्थ सुचवणारी पोस्ट मी परवा लिहिली होती. या पोस्टमध्ये अगदी लहान बाळांना खायला काय देता येईल ते सुचवलं होतं. तसंच काही सोपी सूप्स आणि भाताचे काही सोपे प्रकारही सांगितले होते. आज त्याच पोस्टचा पुढचा भाग. पराठे आणि पु-यांचे काही सोपे प्रकार – साधाContinue reading “लहान मुलांसाठीचे सोपे पदार्थ भाग २”