हमस

गेल्या काही दिवसांत मी ज्या पोस्ट लिहिल्या त्या पारंपरिक भारतीय पदार्थांबद्दल होत्या. आता आपण सगळेच वेगवेगळ्या देशांमधले पदार्थ करत असतो. पास्ता, पिझ्झा, श्वारमा, सँडविचेस, विविध प्रकारची सॅलड्स असे पदार्थ आता सर्रास आपल्या घरांमध्ये होत असतात, ते आपल्याला आवडतातही. शिवाय अधूनमधून सगळ्यांनाच असा बदल हवाही असतो. म्हणूनच या आपल्या पेजवरही मी अधूनमधून अशाच काही सोप्या पदार्थांच्याContinue reading “हमस”

कोशिंबिरी, रायती, सॅलड्स

काही दिवसांपूर्वी मी एक नाश्त्याच्या पदार्थांची एकत्रित माहिती देणारी पोस्ट लिहिली होती. तशाच काही कोशिंबिरींची, भाज्यांची, आमटी, रस्से इत्यादींची आणि मेन्यूंची माहिती देणा-या पोस्ट्स लिहाव्यात असा विचार आहे. शिवाय रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं करावं अशीही एक पोस्ट लिहिणार आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मनीषा कुलकर्णी हिनं कोशिंबिरींबद्दल पोस्ट लिहशील का असं विचारलं होतं, तेव्हाContinue reading “कोशिंबिरी, रायती, सॅलड्स”

मिश्र भाज्यांचं लोणचं

जानेवारी महिना आला की, संक्रांतीची चाहूल लागते आणि संक्रांत म्हटली की तिळाच्या लाडूंबरोबरच, भोगीचं किंवा धुंदुरमासाचं जेवण हमखास आठवतं. मी या महिन्यात, या मोसमात केल्या जाणा-या पदार्थांच्या रेसिपीज शेअर करणार आहेच. धुंदुरमासाचं जेवण, उंधियो, तिळाचे कुटून केले जाणारे लाडू, बाजरीचा खिचडा, कवठाचं पंचामृत आणि चटणी हे सगळे पदार्थ मी या महिन्यात करणार आहे आणि अर्थातचContinue reading “मिश्र भाज्यांचं लोणचं”

कॅरॅमल पुडिंग

मुली लहान असल्यापासून आम्ही आमच्या घरात ख्रिसमस नेमानं साजरा करतो. लहान असताना त्यांना सांताक्लॉज रात्री काही तरी भेटवस्तू आपल्याला नक्की देणार असा गाढ विश्वास होता. आता मोठ्या झाल्यावर हा सांताक्लॉज आपला बाबाच आहे हे माहीत असल्यानं त्या वर्षभर त्याच्याकडून गिफ्ट्स उकळत असतात! आमच्या घरातल्या छोट्याशा बागेत ख्रिसमस ट्री आहे. ते मात्र आम्ही अजूनही सजवतो, म्हणजेContinue reading “कॅरॅमल पुडिंग”

दडपे पोहे

१९८२ मधे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला झालं आणि बाबा मुंबईहून औरंगाबादला आले. आम्ही बीडहून आलो कारण एक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर, मुंबईत घर मिळालं नाही म्हणून आम्ही बीडला परतलो होतो.  उस्मानपु-यातल्या उत्सव मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या घरात आम्ही भाड्यानं राहायला लागलो. अर्थात तेव्हा उत्सव तिथे नव्हतं, तो प्लॉट रिकामा होता. हळूहळू ओळखी व्हायला लागल्या. घरासमोरच्याContinue reading “दडपे पोहे”

तिखट आप्पे

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. मुंबईत तर माटुंगा या भागाला माटुंगम म्हटलं जातं, इतक्या मोठ्या प्रमाणात तामिळ लोकांची वस्ती इथे आहे. माटुंग्यातContinue reading “तिखट आप्पे”

मसाला डोसा, चटणी, सांबार

ब-याच जणांनी नाश्त्यासाठीच्या पदार्थांच्या रेसिपी शेअर करायची फर्माईश केली आहे. दोन महिन्यांपूर्वी मी सांबाराची रेसिपी शेअर केली होती. आज तीच रेसिपी परत शेअर करतेच आहे पण त्याचबरोबर डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणीची रेसिपी पण शेअर करतेय. बारा-तेरा वर्षांपूर्वी चेन्नईला गेले होते. पाहताक्षणी चेन्नईच्या प्रेमातच पडले होते. लांबचलांब पसरलेला मरीना बीच, थिऑसॉफिकल सोसायटीचा विलक्षण निसर्गरम्य असाContinue reading “मसाला डोसा, चटणी, सांबार”

चिंचगुळाची आमटी

भारतीय जेवणात डाळीला फार महत्व आहे. कदाचित असंही असेल की आपल्या देशात तुलनेनं शाकाहारी लोकांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण जेवणात डाळींचा वापर जास्त करत असू. भारतातल्या जवळपास सर्व प्रांतांमधे जेवणात डाळीचा आमटीसदृश पदार्थ असतोच असतो. शिवाय आपल्याकडे भाज्यांमधे भिजवलेल्या डाळी घालतात. किंवा पीठ पेरून भाज्या केल्या जातात त्याही बहुतेकदा डाळींची पिठंContinue reading “चिंचगुळाची आमटी”

पनीर-सिमला मिरची झटपट भाजी

हॅलो, ब-याच दिवसांत आपल्यात काहीच गप्पा झाल्या नाहीयेत. आधी तर सॉरी, कारण दिवाळी अंकाच्या कामामुळे मला माझ्या या आवडत्या पेजकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही म्हणून तुमच्याशीही गप्पा झालेल्या नाहीत. म्हणजे तुमचा जर असा समज असेल की, या काळात मी स्वयंपाकच केलेला नाही तर तसं नाहीये! मी रोजचा स्वयंपाक करत होतेच. पण तो घाईघाईत उरकतContinue reading “पनीर-सिमला मिरची झटपट भाजी”

बेसनाचे लाडू

मित्र-मैत्रिणींनो, आधी तर सॉरी. दिवाळी संपत आली आहे आणि ब-याच जणांनी मला बेसनाच्या लाडूंची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. पण आमच्या नेट-क्या दिवाळी अंकाच्या कामामुळे मला ती वेळेवर शेअर करता आली नाही. कारण रेसिपी शेअर करायची असेल तर ती मला आधी करावी लागते, त्याचे फोटो काढावे लागतात, तरच मला ती आपल्या या पेजवर शेअर करताContinue reading “बेसनाचे लाडू”