नारळी भात

श्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतातContinue reading “नारळी भात”

कॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी

नाश्त्यासाठी रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र प्रसन्ना जोशी यांनी नाश्त्यासाठी सोपे आणि झटपट होणारे पदार्थ सुचवायला सांगितले आहेत. तेव्हा मी आज नाश्त्यासाठीच्या दोन सोप्या पण रूचकर पदार्थांची रेसिपी शेअर करणार आहे. त्यातला पहिला पदार्थ आहे उपमा. उपमा आपण सगळेच करतो. कुणी हळद, उडदाची डाळ, कढीलिंब, सुकी मिरची घालून सांजाContinue reading “कॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी”

राजमा

खरंतर आपल्याकडे उसळी पोळीबरोबर खातात. पण मला स्वतःला जरा रसदार उसळी भाताबरोबर खायला आवडतात. पंजाब्यांचं राजमा-चावल हे असंच एक अप्रतिम काँबिनेशन आहे. भरपूर टोमॅटो वापरून केलेला रसदार राजमा आणि वाफाळता भात! वा! खास पंजाबी पध्दतीनं राजमा करतात तेव्हा तो बरेचदा तुपाच्या फोडणीत करतात. पंजाबी पदार्थ असल्यामुळे अर्थातच आलं-लसूण हवंच आणि थोडा खडा गरम मसालाही. मात्रContinue reading “राजमा”

दाल माखनी किंवा माह की दाल

राजम्याप्रमाणेच आपण दाल माखनी किंवा माह की दाल या खास पंजाबी डाळीला अगदी आपलं म्हटलं आहे. पंजाबात थंडीमुळे असावं पण एकूणच पौष्टिक पदार्थ खाण्यावर खूप भर असतो. म्हणजे आपण ज्या डाळी किंवा कडधान्य पचायला जड असतात असं म्हणतो असे प्रथिनयुक्त पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. राजमा, माह की दाल, छोले नियमितपणे खाल्ले जातात. बरोबर अर्थातचContinue reading “दाल माखनी किंवा माह की दाल”