कैरीची उडदामेथी

सध्या औरंगाबदला माहेरी आले आहे. चार-पाच दिवस राहणार आहे आणि माझ्या आवडीचे खास मराठवाडी असे शक्य तितके पदार्थ खाणार आहे. कालच मेघननं माझ्या बहिणीनं केलेला अतिशय चवदार असा कैरीचा मेथांबा खाल्ला. आठवणीनं सुध्दा तोंडाला पाणी सुटलंय इतका तो चमचमीत झाला होता. खरं सांगायचं तर आज पोस्ट कशाबद्दल लिहावी असा संभ्रम माझ्या मनात आहे. असं पहिल्यांदाचContinue reading “कैरीची उडदामेथी”

ओल्या काजुची उसळ

ओल्या काजुची उसळ किंवा आमटी ही खास कोकणातली खासियत. मी मराठवाड्यातली असल्यामुळे मी ओले काजू पहिल्यांदा बघितले ते लग्नानंतर मुंबईत आल्यावर. मुळात मला सगळ्या सुक्यामेव्यात काजू सर्वात जास्त आवडतात. लग्न ठरल्यावर माझी आई आणि मी मुंबईला आलो होतो तेव्हा आमच्याच कॉलनीतल्या गाडगीळ मावशींनी आम्हा दोघींना जेवायला बोलावलं होतं. तेव्हा गंगाधर गाडगीळ काका अगदी चालतेफिरते होते.Continue reading “ओल्या काजुची उसळ”

पापलेटची आमटी

आधी श्रावण होता म्हणून आणि नंतर गणपती होते म्हणून मी या पेजवर बहुतेकदा शाकाहारी रेसिपीज शेअर केल्या आहेत. पण आता नवरात्रही येऊ घातलंय तेव्हा त्याआधी काही मांसाहारी पाककृती देण्याचा माझा विचार आहे. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे पापलेटच्या आमटीची. पापलेट हा मासा लोकप्रिय आहे. म्हणजे जे मासे खाण्यातले दर्दी आहेत तेContinue reading “पापलेटची आमटी”

काळ्या वाटाण्यांची आमटी

कडधान्यांच्या आमट्या ही सारस्वतांच्या खाद्यसंस्कृतीची एक खासियत. हा सारस्वतांच्या सार्थ अभिमानाचाही विषय! चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी आणि काळ्या वाटाण्यांची आमटी हे तीन प्रकार एकदम वैशिष्ट्यपू्र्ण आहेत आणि अतिशय चविष्टही. या तिन्ही आमट्यांची रेसिपी मी शेअर करणार आहेच. आज मी मला अतिशय आवडणा-या काळ्या वाटाण्यांच्या आमटीची रेसिपी शेअर करते आहे. ही पाककृती मी अर्थातच माझ्या सासुबाईंकडूनContinue reading “काळ्या वाटाण्यांची आमटी”