मिनिमिलिस्टीक लाइफस्टाइल

मिनिमिलिस्टिक लाइफस्टाइल या विषयावर सध्या जगभर बरीच चर्चा होते आहे. आपण सोसासोसानं बरेचदा नको असलेल्या कित्येक गोष्टी खरेदी करत असतो. वापर न होणा-या कितीतरी गोष्टींचा साठा करत असतो. आमच्या आजुबाजूलाच मी बघते, काही मैत्रिणींच्या सासवा, आया या एखादी गोष्ट केवळ त्यांनी खरेदी केली आहे म्हणून वर्षानुवर्षं काढून टाकू देत नाहीत. घरांचे माळे काठोकाठ भरलेले असतात.Continue reading “मिनिमिलिस्टीक लाइफस्टाइल”

उन्हाळ्यातले दिवस – एक स्मरणरंजन

ही पोस्ट फेसबुक पेजवर मी मेमध्ये लिहिली होती. पण या ब्लॉगवर ती आज शेअर करतेय. आज जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. मुंबईत असह्य उकाडा आहे आणि मला बीडचा उन्हाळा आठवतो आहे. बीडला उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मज्जा असायची. सातवीत असेपर्यंत बीडलाच राहात होतो. नंतर आठवीपासून सुटी लागली रे लागली की बीडला पळायचे. म्हणजे परीक्षा समजाContinue reading “उन्हाळ्यातले दिवस – एक स्मरणरंजन”

मसाला लायब्ररीतलं जेवण

आमच्या घराजवळच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हल्ली वेगवेगळ्या प्रकारची किती तरी रेस्टॉरंट्स उघडली आहेत. म्हणजे अगदी साधं रोजचं जेवण देणारं टिफिन बॉक्स आहे, अप्रतिम पिझ्झा मिळणारं पिझ्झा एक्सप्रेस आहे, मला जिथला पिझ्झा अजिबात आवडत नाही ते कॅलिफोर्निया पिझ्झा किचन आहे, सँडविचेस, सॅलड्स, कॉन्टिनेंटल फ्यूजन फूड मिळणारी ल पॅ कुतँदिए (LPQ), कॅफे इन्फिनितो, स्मोक हाऊस डेली ही रेस्टॉरंट्सContinue reading “मसाला लायब्ररीतलं जेवण”

स्पेनच्या आठवणी

दोन वर्षांपूर्वी याच दिवसांमध्ये आम्ही स्पेनला गेलो होतो. देश खूप सुंदर आहे असं ऐकलं होतं आणि प्रत्यक्ष बघितल्यावर तर त्याची खात्रीच पटली. प्रचंड मोठा असा २४ तासांचा प्रवास करून आम्ही स्पेनच्या दक्षिणेला असलेल्या अंदालुसिया या नावानं ओळखल्या जाणा-या प्रांतातल्या मलागा या शहरात पोहोचलो. विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याचं हे जन्मगाव. या गावात पिकासोच्या चित्रांचं एकContinue reading “स्पेनच्या आठवणी”

सिनेमातली खाद्यसंस्कृती

माझा नवरा निरंजन आणि मी सिनेमा-वेडे आहोत. आम्ही सिनेमा बघायला कधीही तयार असतो. कालच आम्ही बोलत होतो की, खाणं केंद्रस्थानी असलेले किती चित्रपट आपण पाहिले आहेत. डोळ्यांसमोर लगेचच जी नावं आली त्यात शोकोला (Chocolat) , ज्युली एंड जुलिया (Julie and Julia), रातातुई (Ratatouille), अ गुड इयर (A good year) , इट प्रे लव्ह (Eat PrayContinue reading “सिनेमातली खाद्यसंस्कृती”