चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.
Tag Archives: Healthiswealth
हिवाळ्यातले पदार्थ – १
मुळात भाजी मंडईत गेलं की किती भाज्या घेऊ आणि किती नको असं होतं. विशेषतः हिवाळ्यात ताज्या रसरशीत भाज्यांचे ढीग बघितले की सगळंच घ्यावंसं वाटतं. हिवाळ्यात बहुतेक भाज्या मिळतात आणि त्याही ताज्या. नुकताच पाऊस होऊन गेलेला असतो त्यामुळे त्या पाण्याचा अंश जमिनीत असतो आणि पावसाळ्यात अति पाण्यानं भाज्या सडतात तसंही होत नाही. हिवाळ्यात मिळणा-या भाज्यांचं कायContinue reading “हिवाळ्यातले पदार्थ – १”
डाएटसाठी चालतील असे पदार्थ
मी गेल्या आठवड्यापासून थोडंसं विचारपूर्वक खायचं ठरवलं आहे. म्हणजे खरंतर मी कधीच फार बेजबाबदारपणे खात नाही. पण तरीही वाढत्या वयानुसार गेल्या वर्षभरात ५-६ किलोंची कमाई केली आहे. त्यातले निदान २-३ किलो कमी करावेत असा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी नियमितपणे, व्यवस्थित खाते आहे. डाएटिंग करताना पाळण्याचा महत्त्वाचा नियम म्हणजे कधीच क्रॅश डाएट करूContinue reading “डाएटसाठी चालतील असे पदार्थ”
सूपचे काही प्रकार
सध्या मी थोडंसं चांगलं खाण्याचा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतेय. मी रोज काय खाते ते मी पोस्ट करत असतेच. अनेकांनी सूपच्या रेसिपीज शेअर करायला सुचवलंय. खरं सांगायचं तर सूपला अशी काही खास रेसिपी नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्यांची काँबिनेशन्स करून चवीला चांगली सूप्स बनवता येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज घातले की चवही बदलते. मीठ-मिरपूड तर आपणContinue reading “सूपचे काही प्रकार”