धपाटे

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरीContinue reading “धपाटे”

तिखट आप्पे

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. मुंबईत तर माटुंगा या भागाला माटुंगम म्हटलं जातं, इतक्या मोठ्या प्रमाणात तामिळ लोकांची वस्ती इथे आहे. माटुंग्यातContinue reading “तिखट आप्पे”

मसाला डोसा, चटणी, सांबार

ब-याच जणांनी नाश्त्यासाठीच्या पदार्थांच्या रेसिपी शेअर करायची फर्माईश केली आहे. दोन महिन्यांपूर्वी मी सांबाराची रेसिपी शेअर केली होती. आज तीच रेसिपी परत शेअर करतेच आहे पण त्याचबरोबर डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणीची रेसिपी पण शेअर करतेय. बारा-तेरा वर्षांपूर्वी चेन्नईला गेले होते. पाहताक्षणी चेन्नईच्या प्रेमातच पडले होते. लांबचलांब पसरलेला मरीना बीच, थिऑसॉफिकल सोसायटीचा विलक्षण निसर्गरम्य असाContinue reading “मसाला डोसा, चटणी, सांबार”

मिसळ

मिसळ आणि कोल्हापूर हे एक अतूट नातं आहे. मिसळीच्या मागे कोल्हापुरी हा शब्द हवाच हवा. मिसळ खाताना नाका-डोळ्यांतून पाणी आलंच पाहिजे, घाम फुटलाच पाहिजे! मटकीची उसळ, बटाट्याचा रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर असा सगळा जामानिमा केल्यावर मिसळ चवदार नाही लागली तर नवलच! काही ठिकाणी मिसळीमधे फोडणीचे कांदे-पोहे पण घालतात. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला गेलोContinue reading “मिसळ”

उपासाची थालिपीठं

मी कुठलेही उपास करत नाही पण मला उपासाचे पदार्थ फार म्हणजे फार प्रिय आहेत. म्हणून बाकी कुठल्या दिवशी नाही पण आषाढी एकादशीला मी उपासाचे सगळे पदार्थ करते. अगदी साबुदाणा खिचडी, भगर किंवा वरीचा भात, दाण्याची आमटी, साबुदाणा वडे, उपासाची बटाट्याची भाजी, उपासाचं थालिपीठ, बटाट्याचे पापड, रताळ्याचे गोड काप. यादी वाचूनच कळतंय ना की आपण उपासालाContinue reading “उपासाची थालिपीठं”

मुळ्याचा पराठा

मला स्वतःला पराठे फार आवडतात. मग ते सारण भरून केलेले असोत की साधे. एकदा दिल्लीला गेले असताना माझी मैत्रीण मैथिली हिच्या नातेवाईकांकडे खाल्लेल्या गोबी पराठ्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. अर्थात उत्तरेत मिळणा-या फ्लॉवर किंवा मुळ्याची चव काही वेगळीच असते. मला मुळ्याचा पराठाही फार आवडतो. मुळ्याचा पराठा सारण भरून केलेलाच छान लागतो. हा पराठा मी दोनContinue reading “मुळ्याचा पराठा”