तुरीच्या दाण्यांची आमटी

प्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. उन्हाळ्याची चाहूल लागली की आंबा डाळ आणि पन्हं, बरोबर वाळ्याच्या अत्तराचा वास यायला लागतो. कारण आजीबरोबर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जायचे ते आठवतं. सगळ्यांकडे मिळणारे ओले हरभरे आणि भिजवलेली डाळ आजी दस्तीत (रूमालाला आमच्याकडे मराठवाड्यात दस्ती म्हणतात) बांधून आणायची आणि नंतर घरी आल्यावर कांदा फोडणीला घालून मुक्त हस्तानं तिखट, काळा मसाला, मीठ,Continue reading “तुरीच्या दाण्यांची आमटी”

झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस

या आधी मी पनीरच्या भाजीची झटपट रेसिपी शेअर केली होती. त्या पोस्टमधे शेवटी मी लिहिलं होतं की ही भाजी, झटपट दालफ्राय आणि पराठ्यांबरोबर किंवा साध्या पोळ्यांबरोबर छान लागते. आज मी त्याच झटपट दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. हे दाल फ्राय तुम्ही या भाजीबरोबर करा किंवा जिरा राईसबरोबर किंवा पुलावबरोबर करा, उत्तम लागतं आणि खरोखरContinue reading “झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस”

तूप-जि-याच्या फोडणीचं वरण

तूप-जि-याची फोडणी म्हटलं की उपासाचे पदार्थच डोळ्यासमोर येतात. साबुदाणा खिचडी किंवा दाण्याची आमटी किंवा बटाट्याची उपासाची भाजी आपण तूप-जि-याच्या फोडणीत करतो. पण रोजच्या जेवणातले काही पदार्थही तूप-जि-याच्या फोडणीत फार छान लागतात. म्हणजे ताकाच्या मठ्ठ्याला तूप-जि-याची हिंग घातलेली फोडणी शिवाय त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता घातला की काय फर्मास लागतं! करून बघा. किंवा तूप-जि-याची फोडणी घालून भेंडीचीContinue reading “तूप-जि-याच्या फोडणीचं वरण”

सांबार

बारा-तेरा वर्षांपूर्वी चेन्नईला गेले होते. पाहताक्षणी चेन्नईच्या प्रेमातच पडले होते. लांबचलांब पसरलेला मरीना बीच, थिऑसॉफिकल सोसायटीचा विलक्षण निसर्गरम्य असा सुंदर परिसर, मोगरा, अबोली आणि मरव्याच्या गज-यांचा ढीग, हिगिन बॉथम्स आणि लँडमार्क ही पुस्तकांची दुकानं ( तेव्हा मुंबईत लँडमार्क आलं नव्हतं), चेन्नई ज्यासाठी प्रसिध्द आहे ती रेशमी कांजीवरम साड्यांची दुकानं आणि कितीतरी गोष्टी होत्या. पण जीContinue reading “सांबार”

काळ्या वाटाण्यांची आमटी

कडधान्यांच्या आमट्या ही सारस्वतांच्या खाद्यसंस्कृतीची एक खासियत. हा सारस्वतांच्या सार्थ अभिमानाचाही विषय! चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी आणि काळ्या वाटाण्यांची आमटी हे तीन प्रकार एकदम वैशिष्ट्यपू्र्ण आहेत आणि अतिशय चविष्टही. या तिन्ही आमट्यांची रेसिपी मी शेअर करणार आहेच. आज मी मला अतिशय आवडणा-या काळ्या वाटाण्यांच्या आमटीची रेसिपी शेअर करते आहे. ही पाककृती मी अर्थातच माझ्या सासुबाईंकडूनContinue reading “काळ्या वाटाण्यांची आमटी”

धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी

पारशी समुदाय हा भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. मूळचे इराणी असलेले पारशी हे मुस्लिम आक्रमकतेच्या भीतीनं भारतात आले आणि ते इथलेच बनून गेले. पहिले पारशी आले ते गुजरातेतल्या उदवाड इथं. म्हणूनच पारशांची मातृभाषा गुजराती झाली. पारशी बायकांनी गुजराती साडीला आपलंसं केलं. भारतीय समाजकारण, अर्थजगत, उद्योगविश्व, मनोरंजन क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रात पारशांनी आपला अमीट ठसाContinue reading “धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी”

दाल माखनी किंवा माह की दाल

राजम्याप्रमाणेच आपण दाल माखनी किंवा माह की दाल या खास पंजाबी डाळीला अगदी आपलं म्हटलं आहे. पंजाबात थंडीमुळे असावं पण एकूणच पौष्टिक पदार्थ खाण्यावर खूप भर असतो. म्हणजे आपण ज्या डाळी किंवा कडधान्य पचायला जड असतात असं म्हणतो असे प्रथिनयुक्त पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. राजमा, माह की दाल, छोले नियमितपणे खाल्ले जातात. बरोबर अर्थातचContinue reading “दाल माखनी किंवा माह की दाल”