कालवणांचे प्रकार – २

याआधीच्या पोस्टमध्ये मी कालवणांबद्दल लिहिलं होतं. आजची पोस्ट हा त्याच पोस्टचा पुढचा भाग आहे. आजच्या या भागात काही खास मराठवाडी आमट्यांचे प्रकार, काही सारस्वती आमट्यांचे प्रकार, काही पिठल्यांचे प्रकार आणि काही उत्तर भारतीय डाळींचे प्रकार यांच्या रेसिपी शेअर करणार आहे. सुरूवातीला काही मराठी कालवणांचे प्रकार गोळ्यांची येसर आमटी – थोड्या डाळीच्या भरड्यात तिखट-हळद-हिंग-मीठ घालून घट्टContinue reading “कालवणांचे प्रकार – २”

कालवणांचे काही प्रकार – १

कुठल्यातरी प्रकारचं पातळ कालवण आपल्या जेवणात असतंच असतं. ज्यात कालवून खाता येतं ते कालवण असंही म्हणायला हरकत नाही. मग ते भाताबरोबर खा किंवा पोळी-भाकरीबरोबर पण ते लागतंच. माझ्या माहेरी मला वरणात भाकरी किंवा पोळी कुस्करून खायची सवय होती. दुपारी शाळेतून आल्यावर बरेचदा दूध-भाकरी कुस्करून बरोबर दाण्याची तिखट चटणी घेऊन खायला मला फार आवडायचं. किंवा कढीContinue reading “कालवणांचे काही प्रकार – १”

स्वयंपाकाचं नियोजन – ४

रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी केली तर मग हा प्रश्न तितकासा त्रास देणार नाही. मी स्वयंपाकाचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला सांगते. आमच्या बांद्रा इस्टमध्ये, आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर रोज भाजी बाजार भरतो.Continue reading “स्वयंपाकाचं नियोजन – ४”

कैरीची उडदामेथी

सध्या औरंगाबदला माहेरी आले आहे. चार-पाच दिवस राहणार आहे आणि माझ्या आवडीचे खास मराठवाडी असे शक्य तितके पदार्थ खाणार आहे. कालच मेघननं माझ्या बहिणीनं केलेला अतिशय चवदार असा कैरीचा मेथांबा खाल्ला. आठवणीनं सुध्दा तोंडाला पाणी सुटलंय इतका तो चमचमीत झाला होता. खरं सांगायचं तर आज पोस्ट कशाबद्दल लिहावी असा संभ्रम माझ्या मनात आहे. असं पहिल्यांदाचContinue reading “कैरीची उडदामेथी”

सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी

माझी बहिण मेघन आणि मी नेहमी एकमेकींबरोबर रेसिपीज शेअर करत असतो. विशेषतः काही वेगळं केलं किंवा कुठे वेगळा पदार्थ खाल्ला तर हमखास लगेचच एकमेकींना सांगतो. तो पदार्थ करूनही बघतो. परवाच मेघनचा फोन आला तो अशाच एका पदार्थाबद्दल सांगण्यासाठी. ती तिच्या एका मैत्रिणीकडे जेवायला गेली होती, तिथे तिनं सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी खाल्ली. ही आमटी फारचContinue reading “सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी”

गोळ्यांची येसर आमटी

मराठवाड्यात लग्नकार्य झाल्यावर जवळच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची प्रथा आहे. या भेटीच्या वेळी येसर-मेतकूट देण्याचा रिवाज आहे. किंबहुना या भेटीला येसर-मेतकूट द्यायला जाणं असंच म्हणतात. आम्ही बीडला राहात असताना लग्नसराईच्या दिवसांनंतर आमच्या घरी आजीच्या-आईच्या मैत्रिणी, आमच्या नात्यातल्या बायका येसर-मेतकूट द्यायला आलेल्या मला आठवतात. मेतकूट तर सगळ्यांना माहीतच आहे. येसर हा जो पदार्थ आहे त्याचीContinue reading “गोळ्यांची येसर आमटी”

तुरीच्या दाण्यांची आमटी

प्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. उन्हाळ्याची चाहूल लागली की आंबा डाळ आणि पन्हं, बरोबर वाळ्याच्या अत्तराचा वास यायला लागतो. कारण आजीबरोबर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जायचे ते आठवतं. सगळ्यांकडे मिळणारे ओले हरभरे आणि भिजवलेली डाळ आजी दस्तीत (रूमालाला आमच्याकडे मराठवाड्यात दस्ती म्हणतात) बांधून आणायची आणि नंतर घरी आल्यावर कांदा फोडणीला घालून मुक्त हस्तानं तिखट, काळा मसाला, मीठ,Continue reading “तुरीच्या दाण्यांची आमटी”

चिंचगुळाची आमटी

भारतीय जेवणात डाळीला फार महत्व आहे. कदाचित असंही असेल की आपल्या देशात तुलनेनं शाकाहारी लोकांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण जेवणात डाळींचा वापर जास्त करत असू. भारतातल्या जवळपास सर्व प्रांतांमधे जेवणात डाळीचा आमटीसदृश पदार्थ असतोच असतो. शिवाय आपल्याकडे भाज्यांमधे भिजवलेल्या डाळी घालतात. किंवा पीठ पेरून भाज्या केल्या जातात त्याही बहुतेकदा डाळींची पिठंContinue reading “चिंचगुळाची आमटी”

तूप-जि-याच्या फोडणीचं वरण

तूप-जि-याची फोडणी म्हटलं की उपासाचे पदार्थच डोळ्यासमोर येतात. साबुदाणा खिचडी किंवा दाण्याची आमटी किंवा बटाट्याची उपासाची भाजी आपण तूप-जि-याच्या फोडणीत करतो. पण रोजच्या जेवणातले काही पदार्थही तूप-जि-याच्या फोडणीत फार छान लागतात. म्हणजे ताकाच्या मठ्ठ्याला तूप-जि-याची हिंग घातलेली फोडणी शिवाय त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता घातला की काय फर्मास लागतं! करून बघा. किंवा तूप-जि-याची फोडणी घालून भेंडीचीContinue reading “तूप-जि-याच्या फोडणीचं वरण”

अळूची पातळ भाजी

श्रावण सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. सारस्वतांमध्येही ही भाजी करतात पण त्या भाजीला ब्राह्मणी भाजीची सर नाही! पुण्यातल्या लग्नांमधल्या पंक्तिंमधे अळूची भाजी, जिलेबी, मसालेभात, जिलेबीचा पाक घातलेली कोबीची भाजी आणि मठ्ठा असाContinue reading “अळूची पातळ भाजी”