तेलवांगं

तेलवांगं हा प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला तो माझ्या मित्राच्या घरी. तोपर्यंत मी या पदार्थाबद्दल फक्त ऐकलं होतं. माझ्या मित्राची गिरीशची बायको दीपा ही कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिचा स्वयंपाक चमचमीत आणि झणझणीत असतो. खास कोल्हापुरी मसाला घालून केलेलं पिठलं तर ती इतकं अप्रतिम बनवते की फक्त बोटं चाटत राहावं. मी एकदा त्यांच्या घरी राहायला गेले होतेContinue reading “तेलवांगं”

स्वयंपाकाचं नियोजन – ४

रोज जेवायला काय करायचं हा यक्षप्रश्न असतो. म्हणजे स्वयंपाकापेक्षाही तो विचारच जास्त त्रास देतो. थोडंसं नियोजन केलं, त्यानुसार यादी करून खरेदी केली आणि थोडीशी पूर्वतयारी केली तर मग हा प्रश्न तितकासा त्रास देणार नाही. मी स्वयंपाकाचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला सांगते. आमच्या बांद्रा इस्टमध्ये, आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर रोज भाजी बाजार भरतो.Continue reading “स्वयंपाकाचं नियोजन – ४”

मटन मसाल्यातली वांग्याची भाजी

माझं माहेर देशस्थ. त्यामुळे घरी एक विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक होतो. शिवाय माझी आजी मुंबई-नाशिकमधे राहिलेली.  त्यामुळे माझ्या माहेरी टिपीकल ब्राह्मणी, गोडसर स्वयंपाक होतो. माझी आई अंबेजोगाईची. तिला झणझणीत तिखट खाणं आवडतं. पण बाबांना तिखट चालत नाही आणि आजी-आजोबांनाही तिखट चालायचं नाही. त्यामुळे आई बिचारी ठेचा किंवा भुरक्याबरोबर जेवायची. मला स्वतःलाही तिखट पदार्थ विशेष प्रिय आहेत.Continue reading “मटन मसाल्यातली वांग्याची भाजी”

फरसबी गाजराची भाजी

रोज भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर आ वासून उभा असतो. मला तर वाटतं की, प्रत्यक्ष पदार्थ करण्यापेक्षा त्याचा विचार करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणून आज-काल कधीकधी माझ्या मनात येतं की, एकदाच काय तो विचार करावा आणि आठवड्याचा मेन्यू लिहून ठेवावा. म्हणजे सकाळचं जेवण झालं की रात्री जेवायला काय करायचं आणि रात्रीचं जेवण झालंContinue reading “फरसबी गाजराची भाजी”

पेंडभाजी किंवा पेंडपाला

महाराष्ट्रातल्या बहुतेक गावांमधे भाकरीबरोबर वरणाचे किंवा डाळीचे घट्ट प्रकार खाण्याची पध्दत आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात गोळा वरणाबरोबर किंवा घट्ट पिठल्याबरोबर भाकरी खातात. आमच्याकडे मराठवाड्यात तुरीचं शिजवलेलं घट्ट वरण, त्यावर कच्चं तेल, तिखट, काळा मसाला घालून, वर बारीक चिरलेलं कांदा-कोथिंबीर घालून खातात. कच्चं तेल आवडत नसेल तर मग लसणाची फोडणी घालूनही खाता येतं. हे वरण गारचContinue reading “पेंडभाजी किंवा पेंडपाला”

भरली वांगी

मसाला भरून भाज्या किंवा मांसाहारी पदार्थ करण्याची पध्दत जगभर प्रचलित आहे. स्टफ्ड मश्रूम्स, स्टफ्ड पटेटोज विथ चीज, स्टफ्ड कॅप्सिकम असेल किंवा टर्किश रेसिपी डोल्मा (Dolma) असेल या सगळ्या भरून केल्या जाणा-या पाककृती आहेत. भारतातही बहुतांश सगळ्या प्रांतांमध्ये भरून भाज्या करण्याची पध्दत आहेच. आपल्याकडेही भरली कारली, भरली भेंडी, भरलं पडवळ, भरली वांगी केली जातातच. हैदराबादला म्हणजेContinue reading “भरली वांगी”