धपाटे

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरीContinue reading “धपाटे”

नाश्त्याचे पदार्थ

नाश्त्याला काय करायचं, मला वाटतं हा प्रश्न चिरंतन आहे. माझ्याकडे माझ्या मदतीला जी मुलगी आहे ती माझ्याकडे सोळा वर्षं आहे. ती रोज मला स्वयंपाक करताना बघते पण तरीही तिचा रोजचा प्रश्न असतो की, ताई, नाश्त्याची काय तयारी करू? एरवी ठीक आहे पण कधीकधी कामात असताना असा प्रश्न आला की चिडचिड होते. मग मी तिला म्हणतेContinue reading “नाश्त्याचे पदार्थ”

दडपे पोहे

१९८२ मधे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला झालं आणि बाबा मुंबईहून औरंगाबादला आले. आम्ही बीडहून आलो कारण एक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर, मुंबईत घर मिळालं नाही म्हणून आम्ही बीडला परतलो होतो.  उस्मानपु-यातल्या उत्सव मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या घरात आम्ही भाड्यानं राहायला लागलो. अर्थात तेव्हा उत्सव तिथे नव्हतं, तो प्लॉट रिकामा होता. हळूहळू ओळखी व्हायला लागल्या. घरासमोरच्याContinue reading “दडपे पोहे”

मिसळ

मिसळ आणि कोल्हापूर हे एक अतूट नातं आहे. मिसळीच्या मागे कोल्हापुरी हा शब्द हवाच हवा. मिसळ खाताना नाका-डोळ्यांतून पाणी आलंच पाहिजे, घाम फुटलाच पाहिजे! मटकीची उसळ, बटाट्याचा रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर असा सगळा जामानिमा केल्यावर मिसळ चवदार नाही लागली तर नवलच! काही ठिकाणी मिसळीमधे फोडणीचे कांदे-पोहे पण घालतात. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला गेलोContinue reading “मिसळ”

उपासाची थालिपीठं

मी कुठलेही उपास करत नाही पण मला उपासाचे पदार्थ फार म्हणजे फार प्रिय आहेत. म्हणून बाकी कुठल्या दिवशी नाही पण आषाढी एकादशीला मी उपासाचे सगळे पदार्थ करते. अगदी साबुदाणा खिचडी, भगर किंवा वरीचा भात, दाण्याची आमटी, साबुदाणा वडे, उपासाची बटाट्याची भाजी, उपासाचं थालिपीठ, बटाट्याचे पापड, रताळ्याचे गोड काप. यादी वाचूनच कळतंय ना की आपण उपासालाContinue reading “उपासाची थालिपीठं”

ज्वारीच्या पिठाची थालिपीठं

माझ्या आईकडे ज्वारीच्या पिठाचा मुबलक वापर करतात. ब-याच पदार्थात व्यंजन म्हणून ज्वारीचं पीठ वापरतात. आई तर भजी करतानाही डाळीच्या पिठाबरोबर थोडंसं ज्वारीचं पीठ घालते, त्यामुळे भजी खुसखुशीत होतात. माझ्या माहेरी थालिपीठं ही ज्वारीच्याच पिठाची होतात. भाजणीचं थालिपीठ फार क्वचित केलं जातं. शिवाय बरेचजण थालिपीठं तळतात. आमच्याकडे थालिपीठं तव्यावर लावतात. आई तर पूर्वी जड बुडाच्या पातेल्यातContinue reading “ज्वारीच्या पिठाची थालिपीठं”

नाचणीचा दोसा

नाचणी हे जरासं दुर्लक्षित धान्य आहे असं मला नेहमी वाटतं. नाचणीत उच्च प्रतीची पोषणमूल्यं तर असतातच पण त्याचबरोबर नाचणीला स्वतःची अशी एक खास चव असते. आदिवासी भागात नाचणी जास्त प्रमाणात पेरली जाते आणि खाल्लीही जाते. महाराष्ट्रात नाचणीची भाकरी, नाचणीचं सत्व, नाचणीचे पापड केले जातात. तर कर्नाटकात नाचणीचे उंडे करतात जे सांबाराबरोबर खातात. नाचणीचे दोसेही आताContinue reading “नाचणीचा दोसा”

साबुदाणा खिचडी

श्रावण नुकताच सुरू झालाय. बरेच लोक श्रावणात मांसाहार करत नाहीत. काही लोक तर कांदा लसूणही खात नाहीत. शिवाय बरेचजण उपासही करतात. उपास म्हटलं की अर्थात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, वरीचे तांदूळ (भगर), दाण्याची आमटी, रताळ्याचा किस, बटाट्याची उपासाची भाजी, उपासाचं थालिपीठ… वा! वा! वा! माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय. साबुदाण्याची खिचडी आपण सगळेच करतो. पण तरीहीContinue reading “साबुदाणा खिचडी”

कॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी

नाश्त्यासाठी रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र प्रसन्ना जोशी यांनी नाश्त्यासाठी सोपे आणि झटपट होणारे पदार्थ सुचवायला सांगितले आहेत. तेव्हा मी आज नाश्त्यासाठीच्या दोन सोप्या पण रूचकर पदार्थांची रेसिपी शेअर करणार आहे. त्यातला पहिला पदार्थ आहे उपमा. उपमा आपण सगळेच करतो. कुणी हळद, उडदाची डाळ, कढीलिंब, सुकी मिरची घालून सांजाContinue reading “कॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी”