कवठाचं पंचामृत

कवठ किंवा Wood Apple हे फळ आपल्याकडे सर्रास मिळत नाही. मी आता गेली वीस वर्षं मुंबईत आहे पण मी कवठ फार कमीदा बाजारात बघितलं आहे. बीडला आणि औरंगाबादला मात्र मी कवठं खूप बघितली आहेत. कवठाची झाडंही बघितली आहेत. मी लहान असताना आई कवठाची चटणी, कवठाचं पंचामृत आणि कवठाचा जॅमही करायची. कवठाच्या जॅमचा रंग फार छानContinue reading “कवठाचं पंचामृत”

भुरका

आजची रेसिपी आहे भुरका. भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार मराठवाड्यात लोकप्रिय आहे. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की काम भागतं. विशेषतः पिठलं, भाकरी, वांग्याचं भरीत किंवा मराठवाड्यात केल्या जाणा-या उकडशेंगोळे या पदार्थाबरोबर भुरका मस्त लागतो. भुरका साहित्य – अर्धी वाटी तेल, मोहरी, २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून शेंगदाण्याचंContinue reading “भुरका”

दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी

मराठी जेवणात ताटात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना म्हणजेच चटणी, लोणची, कोशिंबिरींना महत्वाचं स्थान आहे. कोशिंबिरींमधून जीवनसत्वं मिळतात तर चटण्या आणि लोणची जेवणाची चव वाढवण्याबरोबरच अन्न पचनासाठी आवश्यक असलेल्या पाचक रसांच्या निर्मितीमधे मोलाचं काम बजावतात. म्हणूनच मराठी जेवण हे परिपूर्ण असतं असं म्हणतात ते उगीच नाही. माझ्या माहेरी चटण्या-लोणच्यांची रेलचेल असते. दाण्याची, तिळाची, जवसाची, कारळाची, सुक्या खोब-याचीContinue reading “दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी”